Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बॉक्सिंग रिंगमध्ये भारताच्या 'गोल्डन बॉईज'चे वादळ! सचिन सिवाच-अंकुश पंघालची CWG 2026 मध्ये सुवर्ण कामगिरी

बॉक्सिंग रिंगमध्ये भारताच्या 'गोल्डन बॉईज'चे वादळ! सचिन सिवाच-अंकुश पंघालची CWG 2026 मध्ये सुवर्ण कामगिरी

  • भारताच्या ‘गोल्डन बॉईज’चे वादळ
  • सचिन सिवाचने सुवर्णपदाकवर कोरले नाव
  • अंकुश पंघालनेही केली सुवर्ण कामगिरी
राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) १ ऑगस्ट हा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला.
भारताने बॉक्सिंगमध्ये एक नव्हे तर तब्बल ७ सुवर्णपदकांची कमाई केली. भारतीय बॉक्सर सचिन सिवाचने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.तर, अंकुश पघांलने पुरुषांच्या ८० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात पराभवाच्या उंबरठ्यावरून पुनरागमन करत एक अविस्मरणीय विजय नोंदवला. अंकुशने इंग्लिश बॉक्सर दिमेझी शिट्टूला पराभूत केले आणि भारतासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगमधील सातवे सुवर्णपदक पटकावले. बॉक्सिंग स्पर्धेच्या शेवटी, नरिंदर बेरवालने रौप्यपदक जिंकले. भारताने आता या स्पर्धेत एकूण १३ सुवर्णपदके जिंकली आहेत.

गोल्डन गर्ल्सचा दमदार पंच! CWG 2026 मध्ये प्रिया घंघास आणि साक्षी चौधरीने जिंकले सुवर्णपदक

सचिन सिवाचने सुवर्णपदाकवर कोरले नाव

पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भारताचा सचिन सिवाच आणि नामिबियाच्या ट्रायगेन मॉर्निंग न्डेमेलो यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली.सचिनसाठी सुरुवात आव्हानात्मक होती, पहिल्या दोन फेऱ्यांनंतर तो १-४ ने मागे होता. पण सचिनने तिसऱ्या फेरीत कधीही हार न मानण्याचा बाणा दाखवत, एकाच नॉकआऊट पंचने सामना जिंकून मोठा उलटफेर घडवला. त्याने तिसऱ्या फेरीत दमदार पुनरागमन करत ४-१ अशी आघाडी घेतली. अखेरीस ३-२ स्प्लिट निर्णयाने हा सामना जिंकला आणि भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. या विजयासह, सचिनने बॉक्सिंगमधील भारताचे सहावे सुवर्णपदक निश्चित केले.

अंकुश पंघालनेही केली सुवर्ण कामगिरी

अंकुश पघांलने भारतीय बॉक्सर्सची प्रभावी कामगिरी कायम ठेवली. पुरुषांच्या ८० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अंकुश पंघालचा सामना इंग्लंडच्या डी. शिट्टूशी झाला. इंग्लंडच्या डी. शिट्टूने उत्कृष्ट कामगिरी करत पहिली फेरी ५- ० ने जिंकली. मात्र, दुसरी फेरी अत्यंत चुरशीची आणि रोमांचक होती. दुसऱ्या फेरीत अंकुशने शानदार पुनरागमन केले. फाऊल केल्याबद्दल पंचांनी शिट्टूचा एक गुण कमी केला, ज्यामुळे अंकुशला सामन्यात परतण्याची संधी मिळाली आणि स्प्लिट व्हर्डिक्टने ही फेरी जिंकली. त्यानंतर, तिसऱ्या फेरीत अंकुशने पुन्हा हल्ला चढवला. फाऊल केल्याबद्दल इंग्लंडच्या डी. शिट्टूचा आणखी एक गुण कमी करण्यात आला. पण अंकुशने ही संधी हातातून निसटू दिली नाही. त्याने उत्कृष्ट फूटवर्क दाखवत, जोरदार कॉम्बिनेशन पंच मारले आणि तिसरी फेरी ४-१ ने जिंकत अंतिम सामना जिंकला आणि भारताला बॉक्सिंगमधील ७ वे सुवर्णपदक मिळवून दिले.

नरिंदर बेरवालनेही केली रौप्यपदकाची कमाई

नरेंद्र बेरवालने बॉक्सिंग स्पर्धेतील अंतिम सामना खेळला. पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात नरेंद्रचा सामना इंग्लंडच्या डामार थॉमसशी झाला. थॉमसने पहिल्या फेरीपासूनच पुरुषांच्या ८० किलो वजनी गटावर वर्चस्व गाजवले. मात्र, पहिल्या फेरीपासूनच नरेंद्रला लय सापडली नाही, ज्यामुळे अंतिम सामन्यात त्याला ५-० असा पराभव पत्करावा लागला. परिणामी, नरेंद्रला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताने बॉक्सिंगमध्ये ७ सुवर्ण आणि ७ रौप्य पदकांसह एकूण १० पदके जिंकली.

IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra