Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Breaking : आता रात्रीही सोलर पॅनेलमधून होणार वीज निर्मिती; नव्या तंत्रज्ञानाची कमाल!

Breaking : आता रात्रीही सोलर पॅनेलमधून होणार वीज निर्मिती; नव्या तंत्रज्ञानाची कमाल!

  • विद्यापीठ , लिटूचे संयुक्त संशोधन
  • भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त
Nagpur Rain : नागपूर पाण्याखाली ,मुख्यमंत्र्याच्या शहरात पाणी धुरंधर , बाकी पाण्याच्या अंदर

नागपूर Breaking : सौरऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश संपादन करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लक्ष्मीनारायण अभिनव प्रौद्योगिकी विद्यापीठ (लिटू) येथील संशोधकांनी असे अभिनव संशोधन विकसित केले आहे, ज्यामुळे रात्री सोलर पॅनलच्या माध्यमातून वीजनिर्मिती शक्य होणार आहे.

या नवकल्पनेसाठी संशोधकांना यूके डिझाइन नोंदणी प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. संशोधनात विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोबळे तसेच लिटूच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विजय पावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Nagpur : भर पावसात वेकोलिच्या खाणीत आग; नेमकं कारण काय?

संशोधकांनी सांगितले, सध्या बायफेशियल (दोन्ही बाजूंनी कार्य करणारे) सोलर पॅनल उपलब्ध आहेत. जे वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंनी प्रकाश घेऊन वीजनिर्मिती करतात. मात्र, सूर्यप्रकाश कमी झाल्यानंतर किंवा रात्री त्यांची वीजनिर्मिती क्षमता घटते. या समस्येवर उपाय शोधताना डॉ. ढोबळे आणि डॉ. पावडे यांनी सोलर पॅनलवर आणि खाली एलईडी दिवे बसवून नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ही प्रणाली पवनऊर्जेतून मिळणारी वीज साठवून ठेवते. सूर्यप्रकाश कमी होताच सेन्सरच्या मदतीने एलईडी दिवे आपोआप सुरू होतात आणि कृत्रिम प्रकाश उपलब्ध करून देतात. या कृत्रिम प्रकाशाने सोलर पॅनल रात्रीही वीजनिर्मिती सुरू ठेवू शकतात.

Nagpur Crime : फरार "इक्का" ला २४ तासांत केले जेरबंद

भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त

संशोधकांचा दावा आहे की, या प्रक्रियेसाठी बाह्य ऊर्जा स्रोताची आवश्यकता भासत नाही. उलट ही प्रणाली स्वतःच ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे. या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यास भविष्यात घरे, उद्योग तसेच रस्ते प्रकाश व्यवस्थेसाठी २४ तास सौरऊर्जा उपलब्ध करून देता येईल आणि हे संशोधन समाजोपयोगी ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खंडाळ, अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार तसेच लिटूचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य आणि कुलसचिव डॉ. निरज खटी यांनी दोन्ही संशोधकांचे कौतुक केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra