Dailyhunt
Buddha Purnima 2026: बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि..! बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा हटके शुभेच्छा

Buddha Purnima 2026: बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि..! बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा हटके शुभेच्छा

गवान गौतम बुद्धांची जयंती ही जगभरातील देशांमध्ये वैशाख पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केली जाते. गौतम बुद्धांनी करुणा, अहिंसा आणि आध्यात्मिक शांतीची शिकवण संपूर्ण जगाला दिली. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला.

भगवान बुद्धांच्या विचारांनी जगण्याला बळ मिळत. हा दिवस त्यांचा जन्म दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. गौतम बुद्धांचे विचार समाजातील इतर लोकांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने प्रिय व्यक्तींना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं प्रेरणा मिळेल. बुद्ध पौर्णिमेनिमित्त शेअर करा मराठमोळ्या शुभेच्छा.(फोटो सौजन्य - istock)

Buddha Purnima: कधी आहे बौद्ध पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा …

सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा हृदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महाल सुख सोडूनी घातला
भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्धअसे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा

बुद्धं शरणं गच्छामि,
धम्मं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही
बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करूणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाहीट
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत,
आपण किती प्रेम केले,
आपण किती शांतपणे जगलो
आणि आपण किती उदारपणे क्षमा केली
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

भयाने व्यापत या विश्वात
दयाशील वृत्तीचा मनुष्यच
निर्भयपणे राहू शकतो…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही
बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचाराने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

वेळ आली आहे शांतीची,
आला आहे प्रेमाचा सण..
ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम,
अशा भगवान बुद्धांस माझे नमन
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

Purnima Date List 2026: नवीन वर्षात कधी साजरी केली जाणार आहे …

एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra