Dailyhunt
Budh Shani Conjunction: बुध आणि शनि पुन्हा येणार एकत्र, 22 मेपासून या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

Budh Shani Conjunction: बुध आणि शनि पुन्हा येणार एकत्र, 22 मेपासून या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

  • बुध आणि शनि पुन्हा येणार एकत्र
  • लाभ दृष्टी योग म्हणजे काय
  • 22 मेपासून या राशीेंच्या लोकांचे बदलणार नशीब

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची हालचाल आणि त्यांच्या युती अत्यंत प्रभावी मानल्या जातात.

जेव्हा दोन प्रमुख आणि महत्त्वाचे ग्रह आकाशात एकत्र येतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम राष्ट्र, जग आणि सर्व राशींवर होतो. यावेळी, अशीच एक दुर्मिळ युती शुक्रवार, २२ मे रोजी होणार आहे. बुद्धी आणि व्यवसायाचा ग्रह मानला जाणारा बुध आणि कर्म व न्यायाचा देव शनि, एक अनोखा योग साधत असून, त्यामुळे लाभ दृष्टी योग निर्माण होत आहे. हा महत्त्वपूर्ण योग काही राशींसाठी सुख, समृद्धी आणि अफाट संपत्ती घेऊन येणारा राहील. लाभ दृष्टी योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घेऊया

लाभ दृष्टी योग म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा अनुकूल किंवा पूरक प्रभाव असलेले दोन ग्रह एका विशिष्ट स्थानात स्थित असतात आणि एकमेकांवर शुभ दृष्टी टाकतात, तेव्हा त्याला लाभ दृष्टी योग म्हणतात. बुध हा संवाद, तर्क आणि कौशल्याचा स्वामी आहे, तर शनी शिस्त आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. या दोन्हींच्या संयोगामुळे व्यक्तीच्या जीवनात बौद्धिक क्षमता तसेच आर्थिक स्थैर्य येते. हा संयोग प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत करतो आणि गुंतवणुकीद्वारे आर्थिक लाभाची शक्यता निर्माण करतो.

Vastu Tips: सेकंड हँड वस्तू घरात आणण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे 'हे नियम

लाभ दृष्टी योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढीची बातमी मिळू शकते. बुध आणि शनीच्या आशीर्वादाने तुमच्यामधील आत्मविश्वास वाढू शकतो. ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी कठीण निर्णय घेऊ शकाल. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधीचे वाद मिटू शकतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांचा स्वामी स्वतः बुध असल्याने या राशींच्या लोकांवर या युतीचा सकारात्मक परिणाम होणार आहे. व्यावसायिकांना मोठ्या ऑर्डर्स मिळू शकतात. जर तुम्ही एखाद्या प्रकल्पावर बऱ्याच काळापासून काम करत असाल, तर आता यश मिळवण्याची वेळ आली आहे. शिक्षण आणि माध्यम क्षेत्रातील लोकांसाठी हा सुवर्णकाळ असेल.

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशाचा नियमित ओघही राहील. भागीदारी व्यवसायातून भरघोस नफा मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि कुटुंबात शुभ प्रसंगांचे नियोजन केले जाऊ शकते.

Darshan of Kuladevata: वर्षातून एकदा कुलदेवतेचे दर्शन घेण्यामागे काय आहे धार्मिक परंपरा

मकर रास

मकर रास ही शनिची स्वरास असल्याने या राशींच्या लोकांवर शनिदेवांचा विशेष आशीर्वाद राहील. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. ज्यांना परदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. जुनी कर्जे फेडण्याची शक्यता असून, गुंतवणुकीसाठी हा उत्तम काळ आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी बुध आणि शनिचा हा संयोग मानसिक शांती आणि आर्थिक लाभ दोन्ही आणेल. तुमची निर्णयक्षमता सुधारेल, ज्याचा तुमच्या करिअरवर थेट परिणाम होईल. स्थावर मालमत्ता किंवा शेअर बाजारात गुंतलेल्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra