Dailyhunt
Capital Change History: एकदा-दोनदा नव्हे तर चक्क तीनदा बदलली राजधानी! दक्षिण भारताच्या 'या' राज्याचा इतिहास माहितीये का?

Capital Change History: एकदा-दोनदा नव्हे तर चक्क तीनदा बदलली राजधानी! दक्षिण भारताच्या 'या' राज्याचा इतिहास माहितीये का?

  • दोन राजधानी असणारी राज्ये
  • आंध्र प्रदेशची मूळ राजधानी कोणती होती?
  • तिसऱ्यांदा अमरावती राजधानी
Andhra Pradesh Capital Change History: आपल्या देशाच्या इतिहासात प्रत्येक राज्य आपल्या वेगळेपणासाठी ओळखले जाते.
प्रत्येकाची स्वत:ची वेगळी संस्कृती आणि प्रशासकीय प्रणाली आहे. भारतातील काही राज्यांना एकापेक्षा जास्त राजधान्या आहेत तर काही राज्ये वारंवार राजधान्या बदलल्यामुळे चर्चत आहेत. आज आपण दक्षिण भारतातल्या अशाच एका राज्याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याची राजधानी एकदा – दोनदा नव्हे तर तीन वेळा बदलेली आहे.

दोन राजधानी असणारी राज्ये

आपल्या देशातील हिमाचल प्रदेश व्यतिरिक्त, उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांना दोन राजधान्या आहेत. हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी शिमला तर हिवाळी राजधानी धर्मशाळा येथे आहे. उत्तराखंडची उन्हाळी राजधानी गैरसैण तर हिवाळी राजधानी डेहराडून आहे. तसेच महाराष्ट्राची उन्हाळी राजधानी मुंबई तर हिवाळी राजधानी नागपूर आहे.

भारताचे एक महत्त्वाचे दक्षिण राज्य असलेल्या आंध्र प्रदेशाने आपली राजधानी चक्क तीन वेळा बदलली आहे. इतकेच नव्हे, तर या राज्याची राजधानी इतिहासातही अनेक वेळा बदलेली आहे.

IAS Chinmayee Gopal: केवळ फायलींवर नाही तर ‘ऑन फिल्ड’ अ‍ॅक्शन! भ्रष्ट कर्मचाऱ्यांना घरी पाठवणारी ही कडक अधिकारी कोण?

आंध्र प्रदेशची मूळ राजधानी कोणती होती?

१९५३ पासून, आंध्र प्रदेशची राजधानी कुर्नुल होती. जी १ ऑक्टोबर १९५३ ते १ नोव्हेंबर १९५६ पर्यंत राज्याची तात्पुरती राजधानी होती. त्या काळात, तिने राज्याची तात्पुरती राजधानी म्हणून काम पाहिले.

तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद

कुर्नूलनंतर आंध्र प्रदेशाची राजधानी हैदराबाद होती. जी २०१४ मध्ये बदलण्यात आली. दोन राज्यांच्या फाळणीनंतर हैदराबादला तेलंगणा राज्याची राजधानी बनवण्यात आली.

तिसऱ्यांदा अमरावती राजधानी बनवली.

हैदराबादला तेलंगणाची राजधानी बनवल्यानंतर आंध्र प्रदेशची एक नवीन राजधानी तयार करण्यात आली. पुर्नरचना कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर, अमरावती २ जून २०२४ पासून आंध्र प्रदेशची राजधानी बनली.

Government Jobs for Typing Skills: केवळ टायपिंगच्या जोरावर मिळवता येईल का सरकारी नोकरी? पगार आणि संधींची तुम्हाला कल्पना आहे का?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra