Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Chandrapur News: चंद्रपुरात मुसळधार पावसाचा कहर; 10 तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद, जनजीवन विस्कळीत

Chandrapur News: चंद्रपुरात मुसळधार पावसाचा कहर; 10 तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद, जनजीवन विस्कळीत

  • चंद्रपूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून बल्लारपूरमध्ये सर्वाधिक 178 मिमी पाऊस झाला.
  • मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून खरीप हंगामातील शेतीकामांना वेग आला आहे.
  • चिमूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चंद्रपूर: नागपूर हवामान विभागाने मंगळवारी ऑरेंज अलर्ट तर बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला होता. त्या अंदाजाच्या आधारे मंगळवारी तुरळक पाऊस पडले मात्र बुधवारी रात्री जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान जिल्ह्यातील बल्लारपूर, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी तालुक्यासह एकूण १० तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. रात्रीच्या सुमारास पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप

यावर्षी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिना पूर्ण होत असतांनाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा होती. ती प्रतिक्षा बुधवारी रात्रीच्या सुमारास पडलेल्या पावसाने पूर्ण केली. बुधवारी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल १० तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात बल्लारपूर, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी, राजुरा, कोरपना, जिवती, चंद्रपूर, सावली, सिंदेवाही, मूल या तालुक्यांचा समावेश आहे. बल्लारपूर तालुक्यामध्ये मागील २४ तासात १७८ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. तर त्या पाठोपाठ गोंडपिपरी १२२ मिमी, ब्रह्मपुरी १०३ तर राजूरा १००.९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

यंदा सरासरीच्या केवळ ७२.९ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. त्यापैकी बल्लारपुर तालुक्यामध्ये सरासरीच्या १५४.३ तर जिवती तालुक्यात १०७.५ एवढी सरासरीपेक्षा जास्त नोंद केल्या गेली आहे. आतापर्यंत राजूरा तालुक्यात सरासरीच्या केवळ ५५.४ टक्के एवढी कमी नोंद झालेली आहे. यावर्षी अल निनोचे सावट असल्यामुळे सुरूवातीला पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परीणाम पडल्याचे दिसून आला. मात्र आता पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील शेतकामांना वेग आल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे काही भागातील पिकांचे नुकसान झालेले असले तरी आतापर्यंत पावसाची प्रतिक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा मिळालेला आहे.

दुधातील भेसळीवर मुंढेंचा बुलडोझर? राज्यव्यापी कठोर कारवाई मोहीम हाती घेण्याची मागणी

चिमूर. तालुक्यात रात्री झालेल्या पावसामुळे

चकजाटेपार येथील अंबादास ऋषी धनविजय यांच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत घराचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असून पुढील पंचनामा व शासकीय नियमानुसार मदतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra