Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग होईल आठवडाभरात कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा पपईच्या पानांचा फेसपॅक, त्वचा होईल चमकदार

चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग होईल आठवडाभरात कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा पपईच्या पानांचा फेसपॅक, त्वचा होईल चमकदार

र्षाच्या बाराही महिने त्वचा आणि केसांची काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, काळे डाग किंवा सुरकुत्या आल्यानंतर वेगवेगळे स्किन सिरम आणि फेसपॅक लावून त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते.

पण याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर चेहऱ्यावर टॅनिंग वाढते. टॅनिंग वाढल्यामुळे त्वचा खूप काळवंडल्यासारखी वाटते आणि निस्तेज होऊन जाते. चेहऱ्यावरील ग्लो कमी झाल्यामुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास सुद्धा कमी होऊन जाते. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी हजारो रुपये खर्च करून वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट केल्या जातात. कधी फेस बोटॉक्स तर कधी हायड्रा फेशिअल करून चेहऱ्यावरील टॅनिंग कमी केला जातो.(फोटो सौजन्य - istock)

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून सुद्धा चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करता येते. आज आम्ही तुम्हाला पपईच्या पानांपासून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा फेसपॅक चेहऱ्यावरील टॅन कमी करून त्वचा उजळदार आणि सुंदर करण्यास मदत करेल. याशिवाय पिंपल्स, ऍक्ने, टॅनिंग कमी करून त्वचेवर चमकदार ग्लो येईल. त्वचेचा मूळ राग सुधारण्यासाठी कायमच केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते.

पपईचा पानांचा फेसपॅक बनवण्याची कृती:

पपईच्या पानांचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पपईच्या पानांचा रस काढून घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा बेसन आणि मध घालून व्यवस्थित पेस्ट मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक काहीवेळ तसाच ठेवा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅक लावून काहीवेळ सुकण्यासाठी तसाच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती आणि प्रदूषणामुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल. फेसपॅक लावून झाल्यानंतर त्वचा कायमच थंड पाण्याने स्वच्छ करावी. त्यानंतर कोणतेही जेल क्रीम त्वचेवर लावावे.

टॅनिंग आणि डार्क सर्कल होतील ७ दिवसांमध्ये कमी! गूळ लिंबाचा फेसपॅक चेहऱ्यावर आणेल मोत्यासारख्या ग्लो, त्वचा दिसेल फ्रेश

पपईच्या पानांमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होण्यास मदत होते. तसेच पपईच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे ए, सी आणि ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन, पपेन एन्झाइम्स, फायबर, प्रथिने आणि कर्बोदके इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्वचेवर आलेले पिंपल्स आणि मुरूम आतून स्वच्छ होण्यासाठी पपईच्या पानांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पपईच्या पानांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा सुंदर आणि चमकदार होईल.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra