Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चेहऱ्यावरील ओपन पोअर्स २ आठवड्यात होतील गायब! 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा ग्रीन टी, स्पॉटलेस स्किनसाठी घरगुती उपाय

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स २ आठवड्यात होतील गायब! 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा ग्रीन टी, स्पॉटलेस स्किनसाठी घरगुती उपाय

र्वच महिलांना आपली त्वचा कायमच चमकदार आणि सुंदर हवी असते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, काळे डाग किंवा पिगमेंटेशन घालवण्यासाठी महिला सतत काहींना करत असतात. कधी फेशिअल करून घेतले जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी केला जातो.

पण गालावर दिसून येणारे ओपन पोअर्स काही केल्या लवकर कमी होत नाही. गालावर ओपन पोअर्स वाढल्यानंतर त्वचा जाळी दिसू लागते. त्वचेवर वाढलेल्या छिद्रांमध्ये घाण आणि धूळ मातीचे कण सहज साचून राहतात, ज्याच्या परिणामामुळे मोठे मोठे पिंपल्स आणि फोड येऊन त्वचेवर तेज कमी होऊन जाते.त्वचेची काळजी घेताना वारंवार चुकीच्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावेत.(फोटो सौजन्य - istock)

Lipstick Side Effects: दररोज लिपस्टिक लावल्याने ओठ खरंच कोरडे होतात का? जाणून घ्या सत्य

गालावर ओपन पोअर्स वाढल्यानंतर मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचा सुंदर दिसत नाही. तर काहीवेळा मेकअपचे प्रॉडक्ट त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झाल्यामुळे त्वचा काही दिवसांमध्ये खूप जास्त टॅन आणि डाग, पिंपल्स येऊन खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गालावर आलेले ओपन पोअर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी चा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ग्रीन टी च्या वापरामुळे त्वचेवर आलेले ओपन पोअर्स कमी होण्यासोबतच त्वचा उजळदार आणि सुंदर दिसते. चला तर जाणून घेऊया ग्रीन टी वापरण्याची सोपी पद्धत.

ग्रीन टी वापरण्याची सोपी पद्धत:

सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. वजन कमी करताना अनेक लोक ग्रीन टी चे सेवन करतात. ग्रीन टी प्यायल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. तसेच त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. अर्धा कप पाणी गरम करून त्यात ग्रीन टी बॅग टाकून काहीवेळ तसेच ठेवा. पाणी थंड होईपर्यंत ग्रीन टी बॅग तशाच ठेवाव्यात. त्यानंतर काढून स्प्रे बॉटलमध्ये १ चमचा गुलाबपाणी घालून मिक्स करा. तयार केलेले पाणी थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे.

लालचुटुक टोमॅटो त्वचेवर करेल जादू! सुरकुत्या आणि काळे पिग्मेंटेशन घालवण्यासाठी 'या' पद्धतीने करा वापर, त्वचा होईल गोरीपान

तयार केलेले टोनर त्वचा स्वच्छ केल्यानंतर चेहऱ्यावर मारून काहीवेळ तसेच ठेवा. टोनरचा वापर दिवसभरातून दोनदा किंवा तीनदा करावा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होईल. नियमित ग्रीन टी टोनरचा वापर केल्यास आठवडाभरात त्वचा अतिशय हायड्रेट आणि ग्लोइंग दिसते. ग्रीन टीमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात आढळून येते. त्वचा मऊ, मुलायम होण्यासाठी ग्रीन टी चा वापर करावा. तुमची त्वचा जर खूप जास्त तेलकट किंवा चिकट असेल तर ग्रीन टी चा आवर्जून वापर करावा. यामुळे त्वचेवर तेल कमी होऊन त्वचा फ्रेश दिसते.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra