Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Chhattisgarh Crime: शारीरिक संबंधच नाही, मग प्रेग्नेंट कशी? 6 महिन्यांच्या प्रेमविवाहाचा भयावह अंत, काय घडलं नेमकं?

Chhattisgarh Crime: शारीरिक संबंधच नाही, मग प्रेग्नेंट कशी? 6 महिन्यांच्या प्रेमविवाहाचा भयावह अंत, काय घडलं नेमकं?

त्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशायमुळे पतीने आपल्या गरोदर पत्नीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकून दिला.

आरोपीने असा दावा केला की, त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नसतानाही त्याची पत्नी गर्भवती कशी झाली?. नुकताच ६ महिन्याआधीच त्यांनी प्रेमविवाह केला होता.

Beed Crime: बीडमध्ये हुंडाबळी, लग्नाच्या दोन महिन्यात नवविवाहितेने संपवलं आयुष्य; मृतदेहावर आढळेल अनेक जखमा अन्…

प्रकरण काय?

हत्या झालेल्या तरुणीचा नाव २२ वर्षीय संगीता निषाद अशे आहे. तर आरोपीचे नाव संजू निषाद असे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संजू आणि संगीता यांची प्रेम कहाणी गेल्या वर्षी सुरु झाली. संजू हा वयाने संगीता पेक्षा लहान होता. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. लग्नाच्या आधी संगीता प्रेग्नेंट राहिली. अखेर दोघांनीही परस्पर संमतीने औषधांद्वारे गर्भपात केला. 2024 च्या अखेरीस दोघांचं लग्न झालं. संगीताला आशा होती की लग्नानंतर दोघेही त्यांच्या मुलाचं दुःख विसरून एक नवीन सुरुवात करू शकतील. पण घडलं काही उलटच

लग्नानंतर दुरावा वाढला आणि…

दोघांनी लग्न केलं, सुरुवातीचे काही महिने सगळं चांगले होते. त्यांनतर हळू हळू त्यांच्यात दुरावा वाढत गेला आणि याच दरम्यान संगीता पुन्हा प्रेग्नेंट राहिली… पण संजू याच्या चेहऱ्यावर वडील होण्याचा आनंद नव्हता. हे मुल स्वीकारण्यास त्याने नकार दिला. तो संगीतावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करू लागला. संजूने असाही दावा केला की त्याचे संगीतासोबत कोणतेही शारीरिक संबंध नव्हते. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण वाढू लागले.

काही झालंच नाही असं राहू लागला

दोघांमधील वाद टोकाला गेली. अखेर संजू यांने संगीताच्या मानेवर धारदार चाकून वार केला. यामध्ये तिचा मृत्यू झालं. अशा परिस्थितीत घाबरलेल्या संजूने पत्नीचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकून दिला. त्यानंतर काही झालंच नाही… असं तो राहू लागला…

चौकशीत गुन्हा कबूल

संगीताच्या कुटुंबीयांनी सांगितलं वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही संपर्क होऊ शकला नाही. अखेर दोन दिवसानंतर संगीता हिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोधकार्य सुरु केल्यानंतर संगीता हिचा मृतदेह पोलिसांना नदीच्या किनारी आढळला. चाकू हल्ल्यामुळे पोलिसांना संजूवर संशय आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला.

Akola News : जो कोणी आरोपीचा हात, पाय आणि लिंग कापेल त्याला…, ठाकरे गटाच्या नेत्याने दिला इशारा; प्रकरण काय?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra