Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Cristiano Ronaldo Retirement:'हा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्ड कप?' बहिणीच्या दाव्याने खळबळ; निवृत्तीवर CR7चे मोठे वक्तव्य

Cristiano Ronaldo Retirement:'हा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्ड कप?' बहिणीच्या दाव्याने खळबळ; निवृत्तीवर CR7चे मोठे वक्तव्य

  • हा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्ड कप?
  • बहिणीच्या दाव्यानंतर खळबळ
  • निवृत्तीवर रोनाल्डोचे मोठे वक्तव्य
Cristiano Ronaldo to retire after 2026 FIFA World Cup: फुटबॉलचा दिगग्ज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
फिफा विश्वचषक २०२६ हा रोनाल्डोचा शेवटचा विश्वचषक असून यानंतर तो त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून रिटायमेंट घेणार आहे. असे संकेत, नाल्डोची बहीण काटिया अवेरो हिने दिले आहेत. या मोठ्या स्पर्धेत पोर्तुगालच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या बातमीने क्रीडाविश्वात खळबळ उडवून दिली असून, याला रोनाल्डोचा ‘शेवटचा डाव’ मानले जात आहे.

Cristiano Ronaldo: रोनाल्डोचा नॉकआउट गोल! विश्वचषकात रचला इतिहास; क्रोएशियावर 2-1 ने मात करत पोर्तुगालची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक

रोनाल्डोची बहीण काटिया काय म्हणाली?

पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातील फिफा विश्वचषक २०२६ च्या राउंड ऑफ ३२ संघांच्या फेरीतील सामन्यापूर्वी, ख्रिस्तियानो रोनाल्डोची बहीण, काटिया अवेरो हिने एक महत्वाचा दावा केला. तिने म्हटले की, हा विश्वचषक रोनाल्डोची शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल आणि त्यानंतर तो पोर्तुगीज राष्ट्रीय संघातून निवृत्त होईल. ती म्हणाली, ‘जोपर्यंत हा प्रवास सुरू आहे, तोपर्यंत त्याचा आनंद घ्या. तो लवकरच संपणार आहे. मला एका अत्यंत विश्वासार्ह सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार… हा रोनाल्डोचा ‘'लास्ट डान्स’ आहे.’ काटियाच्या या वक्तव्यामुळे जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. अनेकांनी असा निष्कर्ष काढला की, ४१ वर्षीय रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली आहे.

रोनाल्डोने स्वतःच मौन सोडले

क्रोएशियाविरुद्धच्या २-१ च्या रोमांचक विजयानंतर, रोनाल्डोने स्वतःच या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने स्पष्ट केले की, तो स्पर्धेदरम्यान आपल्या भविष्याबद्दल कोणताही निर्णय घेणार नाही. रोनाल्डो म्हणाला, “मी घाईचे किंवा न विचार करता कोणताही निर्णय घेत नाही. मी माझ्या भविष्याबद्दलचा निर्णय स्पर्धा संपल्यानंतर घेईन, आता नाही.” या वक्तव्याद्वारे, त्याने बहिणाच्या दाव्यांना फेटाळून लावले आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मैदानावरही इतिहास घडला

क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने केवळ आपल्या वक्तव्यानेच नव्हे, तर आपल्या कामगिरीनेही लक्ष वेधून घेतले. VAR च्या मदतीने मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून त्याने विश्वचषकाच्या बाद फेरीतील पहिला गोल केला. वयाच्या ४१ वर्षे आणि १४७ दिवसांत, तो फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतील सामन्यात गोल करणारा इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडूही ठरला. यापूर्वी हा विक्रम त्याचा माजी सहकारी पेपेच्या नावावर होता. याशिवाय, विश्वचषकाच्या बाद फेरीतील रोनाल्डोचा हा पहिलाच गोल होता. तो विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक खेळत आहे.

इव्हान पेरिसिचच्या गोलमुळे क्रोएशियाने आघाडी घेतली, पण रोनाल्डोने बरोबरी साधली. त्यानंतर गोन्कालो रामोसने अतिरिक्त वेळेत विजयी गोल करून पोर्तुगालला २-१ असा विजय मिळवून दिला.

IPL ट्रेडमध्ये मोठा ट्विस्ट! हार्दिक पांड्या CSK मध्ये जाणार? चेन्नई सुपर किंग्सने भूमिका केली स्पष्ट

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra