Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Cristiano Ronaldo: रोनाल्डोचा नॉकआउट गोल! विश्वचषकात रचला इतिहास; क्रोएशियावर 2-1 ने मात करत पोर्तुगालची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक

Cristiano Ronaldo: रोनाल्डोचा नॉकआउट गोल! विश्वचषकात रचला इतिहास; क्रोएशियावर 2-1 ने मात करत पोर्तुगालची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक

  • रोनाल्डोचा नॉकआउट गोल
  • क्रोएशियावर 2-1 ने मात
  • पोर्तुगालची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक
फिफा विश्वचषक २०२६ च्या ( FIFA World Cup 2026) राउंड ऑफ ३२ फेरीत पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यात टोरोंटो स्टेडियमवर सामना खेळला गेला.
पोर्तुगालने हा सामना २-१ ने जिंकून १६ संघांच्या ( Round of 16) फेरीत आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टी मिळाल्यानंतर निर्णायक क्षणी गोल केला. रोनाल्डो आता विश्वचषकाच्या इतिहासात बाद फेरीच्या सामन्यात गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे

पोर्तुगालनचा शेवटच्या क्षणी विजय

क्रोएशियाविरुद्धचा राऊंड ऑफ ३२ चा सामना पोर्तुगालसाठी अजिबात सोपा नव्हता, कारण पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या हाफच्या ५३ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या पेरिसिचने गोल करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर पोर्तुगालने जोरदार पुनरागमन केले आणि ६४ व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करून स्कोअर १-१ असा बरोबर केला. त्यानंतर ८१ व्या मिनिटाला रोनाल्डोला बदली करण्यात आले आणि त्याच्या जागी रुबेन नेवेसला खेळवण्यात आले. ९० व्या मिनिटाला, राफेल लिओच्या क्रॉसवर रामोसने हेडरद्वारे गोल करून पोर्तुगालला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

क्रोएशियानेही गोल केला, पण पोर्तुगालने केली अपील

पोर्तुगालने २-१ अशी आघाडी घेतल्यानंतर, क्रोएशियाने आक्रमक खेळ करत ९० व्या मिनिटाला गोल केला. मात्र, पोर्तुगालने ऑफसाईडसाठी अपील केले, जे पंचांनी तपासले आणि VAR ने ठरवले की क्रोएशियन खेळाडूने पास दिला तेव्हा त्यांचा दुसरा खेळाडू ऑफसाईड होता, त्यामुळे तो गोल अवैध ठरवण्यात आला. खेळ तीन मिनिटे सुरू राहिला आणि पंचांनी शिट्टी वाजवताच पोर्तुगाल २-१ ने जिंकला.

रोनाल्डोने विश्वचषकमध्ये बाद फेरीच्या सामन्यात पहिला गोल

रोनाल्डोने या विश्वचषकात आतापर्यंत तीन गोल केले आहेत, ज्यात उझबेकिस्तानविरुद्धच्या गट फेरीतील सामन्यातील दोन गोलांचा समावेश आहे. यानंतर, बाद फेरीच्या सामन्यात कधीही गोल न करण्याचा आपला विक्रम मोडण्याचे सर्वात मोठे आव्हान त्याच्यासमोर होते. रोनाल्डोने क्रोएशियाविरुद्ध ६८ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून आपल्या कारकिर्दीतील पहिला विश्वचषक बाद फेरीतील गोल नोंदवला. ४१ वर्षे आणि १४७ दिवसांचा असताना, रोनाल्डो विश्वचषक बाद फेरीच्या सामन्यात गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्याने पोर्तुगालचा माजी खेळाडू पेपेचा विक्रम मोडला, ज्याने २०२२ च्या विश्वचषकात स्वित्झर्लंडविरुद्ध ३९ वर्षे आणि २८३ दिवसांच्या वयात बाद फेरीच्या सामन्यात गोल केला होता.

राऊंड ऑफ १६ मध्ये पोर्तुगालसमोर स्पेनचे आव्हान असेल, ज्यांनी आतापर्यंत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्पेनने राऊंड ऑफ ३२ चा सामना ऑस्ट्रियाविरुद्ध ३-० ने जिंकला असून, या विश्वचषकात त्यांच्याविरुद्ध एकही गोल झालेला नाही.

Bel vs Sen FIFA 2026: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra