Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Cyber Crime: टेलिग्रामवर बाल अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार; बी.कॉम.च्या दोन विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून अटक

Cyber Crime: टेलिग्रामवर बाल अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार; बी.कॉम.च्या दोन विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून अटक

  • टेलिग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ विकणाऱ्या दोन बी.कॉम. विद्यार्थ्यांना अटक.
  • एका फोटोसाठी ५ रुपये, तर एका व्हिडिओसाठी १०० ते ४९९ रुपये आकारून बेकायदेशीर कमाई.
  • तांत्रिक तपासात ३,०४१ संशयित व्हिडिओंचे धागेदोरे; सुमारे २०० व्हिडिओ जप्त, पुढील फॉरेन्सिक तपास सुरू.
छत्रपती संभाजीनगर:छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर पोलिसांनी अत्यंत धक्कादायक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर आणि टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंची विक्री करणाऱ्या बी.कॉम.च्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. झटपट पैशांच्या मोहापायी गेल्या दीड वर्षांपासून हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचा प्राथमिक तपासात दावा करण्यात आला असून, या प्रकरणात हजारो संशयित व्हिडिओंचे धागेदोरे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

एका फोटोसाठी ५ रुपये, व्हिडिओसाठी ४९९ रुपये

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी एका फोटोसाठी ५ रुपये, तर एका व्हिडिओसाठी १०० ते ४९९ रुपये आकारत होते. विक्रीतून मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत होती. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी क्लाऊडवरील डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक तपासात तब्बल ३,०४१ संशयित व्हिडिओंचे धागेदोरे समोर आले. त्यापैकी सुमारे २०० व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून, उर्वरित डेटा फॉरेन्सिक तपासाच्या माध्यमातून पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

9 महिन्यांच्या बाळाचे तोंड फेव्हीक्विकने चिटकवण्याचा प्रयत्न; पुण्यात महिलेचं संतापजनक कृत्य

चार दिवसांत दुसरी मोठी कारवाई

विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. इंटरनेटचा गैरवापर, झटपट पैशांचा मोह आणि वाढते सायबर गुन्हे यामुळे तरुणाई नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे, हा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १० वर्षांच्या चिमुकलीला १०० रुपयांचे आमिष दाखवून रिक्षात ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि दाखवलेल्या धैर्यामुळे एका चिमुकलीचे प्राण व भविष्य वाचले असून अपहरणाचा हा भयानक डाव उधळला गेला आहे. घडलेली घटना ही गजबजलेल्या शाहगंज बाजारात घडली.

Pune Crime : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त; सिंहगड रस्ता पोलिसांची मोठी कारवाई

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra