Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग रात्री झोपताना लावा 'ही' घरगुती क्रीम, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग रात्री झोपताना लावा 'ही' घरगुती क्रीम, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

धावपळीची जीवनशैली, रात्रभर जागरण किंवा उशिरा झोप, मोबाईलचा अतिवापर, तासनतास स्किन समोर बसून राहणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवरसुद्धा लगेच दिसून येतो. यामुळे डोळ्यांखाली काळे डाग येऊन त्वचा पूर्णपणे निस्तेज दिसू लागते.

डार्क सर्कल्स आल्यामुळे काहीवेळा आजारी असल्यासारखे वाटते. कारण त्वचेवरील ग्लो पूर्णपणे नाहीसा होतो. डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. फेसपॅक, आयक्रीम, सीरम, फेस क्रीम यासोबतच महागड्या स्किन ट्रीटमेंट आणि डार्क सर्कल्स घालवण्यासाठी ट्रीटमेंट केल्या जातात. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर करणे त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी घरगुती क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. महिनाभर नियमित क्रीम लावल्यास फरक दिसून येईल.(फोटो सौजन्य - istock)

पावसाळ्यात का वाढतो Fungal Infections चा धोका? त्वचेसंबंधित दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

घरगुती फेसक्रीम बनवण्याची सोपी पद्धत:

क्रीम तयार करण्यासाठी मोठ्या बाऊलमध्ये बटाट्याचा रस, विटामिन ई कँप्सूल, ऑलिव्ह ऑईल आणि कोरफड जेल एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेली क्रीम व्यवस्थित फेटून झाल्यानंतर तिचा रंग हलकासा बदलेल. तयार केलेली क्रीम हवाबंद डब्यात भरून ठेवा. जेणेकरून लवकर खराब होणार नाही. तयार केलेली क्रीम फ्रिजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहते. लवकर खराब होत नाही.

रात्री झोपण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्वचा स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर डोळ्यांखाली क्रीम लावून १ ते २ मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे डोळ्यांखालील त्वचेचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि पेशींची गुणवत्ता सुधारेल. हा उपाय नियमित केल्यास २ आठवड्यांमध्ये फरक दिसून येईल. क्रिममध्ये बटाट्याचा रस वापरल्यामुळे काळेपणा कमी होण्यास मदत होईल. एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस तयार केलेली क्रीम वापरू नये.

आठवडाभरात चेहऱ्यावरील डाग होतील कायमचे गायब! कच्च्या दुधाचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो

डोळ्यांभोवती आलेले काळे डाग कमी करण्यासाठी केवळ महागड्या क्रीमच नाहीतर आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. रोजच्या आहारात विटामिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. नियमित टोमॅटो, पालक, गाजर आणि विटामिन सी युक्त फळांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी आणि इतर थंड पेय प्यावी. ताक, दूध, लस्सी इत्यादींमुळे पचनक्रिया निरोगी राहते.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra