Wednesday, 15 Sep, 1.23 pm नवराष्ट्र

होम
देश | भंगार साहित्यापासून बनविला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा

मोदी यांचा पुतळ्यासाठी बाईकची साखळी, गीअर व्हील्स, लोखंडी सळई, नट, बोल्ट असे साहित्य वापरण्यात आले आहे. हा पुतळा बनवण्यासाठी हा पुतळा बनवायला तब्बल २५ दिवसांचा कालावधी लागला.१० कलाकार यासाठी दिवस रात्र काम करत होते. पंतप्रधान मोदींचा तब्बल १४ फुट उंचीचा पुतळा या कलाकारांनी साकारला आहे.साधारण कुठलाही पुतळा कांस्यधातूपासून बनवला जातो.

    आंध्र प्रदेशच्या पित्रा पुत्रांनी एक अनोखी कलाकृती साकारली आहे. त्यांनी भंगाराच्या साहित्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्यासाठी भंगारातील दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे एक टन भंगाराचे साहित्य वापरण्यात आले आहे. तेलंगाणाच्या हैद्राबाद, तमिळनाडूच्या विशाखापट्टण आणि आंध्र प्रदेशच्या गुंटुर शहरातून हे साहित्य जमा करण्यात आले आहे.

    या साहित्याचा केला वापर
    मोदी यांचा पुतळ्यासाठी बाईकची साखळी, गीअर व्हील्स, लोखंडी सळई, नट, बोल्ट असे साहित्य वापरण्यात आले आहे. हा पुतळा बनवण्यासाठी हा पुतळा बनवायला तब्बल २५ दिवसांचा कालावधी लागला.१० कलाकार यासाठी दिवस रात्र काम करत होते. पंतप्रधान मोदींचा तब्बल १४ फुट उंचीचा पुतळा या कलाकारांनी साकारला आहे.साधारण कुठलाही पुतळा कांस्यधातूपासून बनवला जातो. परंतु पंतप्रधान मोदींचा पुतळा भंगारातील साहित्यापासून बनवताना त्यांचा चेहरा बनवण्यात अडचण आली असे व्यंकटेश राव म्हणाले. मोदींच्या चेहरा, केशभुषा, दाढी आणि चष्म्यासाठी वायरचा उपयोग करण्यात आल्याचे राव यांनी सांगितले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी जन्मदिवस आहे. यंदा ते वयाची सत्तरी पूर्ण करत आहेत. त्याचे औचित्य साधून भाजप नगरसेवक मोहन राजु यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींचा हा पुतळा बंगळुरुच्या एका उद्यानात बसवण्यात येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top