Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देवदूतासारखा धावला आरपीएफ जवान! पुणे रेल्वे स्थानकावर ट्रेनखाली जाणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण

देवदूतासारखा धावला आरपीएफ जवान! पुणे रेल्वे स्थानकावर ट्रेनखाली जाणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण

पुणे : चालत्या ट्रेनमध्ये घाईघाईने चढण्याचा प्रयत्न करताना एका महिला प्रवाशाचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील धोकादायक पोकळीत (गॅप) कोसळली. मात्र पुणे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाने प्रसंगावधान दाखवत तिचे प्राण वाचवले.

ही घटना पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दिनांक २ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३८ वाजता घडली आहे.

गाडी क्रमांक ११०१४ कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना अंगवी शेख (रा. सारा अपार्टमेंट, शिवाजी नगर, मुंब्रा, ठाणे) या महिला प्रवाशाने धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. चढताना त्यांचा पाय फूटबोर्डवरून घसरला आणि त्या ट्रेन व प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडल्या. त्याच वेळी ड्युटीवर असलेले आरपीएफ हेड कॉन्स्टेबल जितेंद्र महाजन यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेत महिलेला पकडले आणि जोराने ओढून सुरक्षित बाजूला आणले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 28 हेक्टर जागेमध्ये 'आयआयएम'; राज्याच्या महसूल व वन विभागाकडून अध्यादेश जारी

ही संपूर्ण थरारक घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरपीएफच्या 'ऑपरेशन जीवन रक्षा' अंतर्गत केलेल्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी महाजन यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना विशेष पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना पुन्हा आवाहन केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत चालत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये.

"ट्रेन चुकण्याच्या भीतीने मी चालत्या गाडीत चढण्याचा धोका पत्करला होता. माझे प्राण वाचवल्याबद्दल हेड कॉन्स्टेबल जितेंद्र महाजन आणि आरपीएफ पथकाचे मनापासून आभार."

- अंगवी शेख, प्रवासी महिला.

हे सुद्धा वाचा : चिखली-मोशी परिसरात उभारणार आधुनिक एसटी स्थानक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra