- हिमालयातील दुर्मिळ आणि उंच वाढणाऱ्या एका विशेष फुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
- व्हिडिओमध्ये ट्रेकिंगदरम्यान काही तरुणांना हे अनोखे फूल दिसते आणि त्याच्या आकारामुळे सर्वांचे लक्ष वेधले जाते.
- व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी दुर्मिळ वनस्पती तोडल्याबद्दल नाराजी व्यक्त करत निसर्ग संवर्धनाची गरज अधोरेखित केली.
काय दिसलं व्हिडिओत?
हा व्हिडिओ @bishal limbu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यात व्यक्ती आपल्या मित्रांसोबत धोकादायक टेकड्यांवर चढाई करायला गेल्याचे दिसते. इथेच त्यांना हे दुर्लभ फुल दिसून आले. मित्रांमधील एकाने हे मूल आपल्या हातात घेऊ पाहिले. फूल हातात घेतल्यानंतर याची लांबी एका लहान मुलाच्या उंची इतकी असल्याचे स्पष्ट झाले. इतक्या मोठ्या उंचीचे फूल तुम्ही क्वचितच कुठे पाहिले असावे. मिळालेल्या माहितीनुसार, या फुलांची उंची साधरणपणे ३.२ ते ६.५ फूट इतकी असते. ही लांबी एका सामान्य मानवा इतकी आहे.
या फूलांना अनेक नावाने संबोधले जाते त्यांना खास करुन डायमंड फ्लाॅवर या नावाने ओळखले जाते. याच खरं नाव हे केन्जो असे आहे तर काही भागात या हिमालयीन फुलाला पद्मचल असेही म्हणतात. त्यांचा फुलण्याचा एक विशिष्ट हंगाम असतो. दर ७ ते १५ वर्षांनी ही फुले फुलतात आणि म्हणूनच त्यांचे दिसणे फार दुर्मिळ मानले जाते.
छतावरील वाद विकोपाला! संतापलेल्या पतीने पत्नीला शिडीवरून ढकललं; धक्कादायक Video Viral
हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडितील दृष्यांबाबत आपले मत कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, "वाढायला १५ वर्षे लागली… आणि ते अशा प्रकारे उपटून टाकलं!?", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "किती वाईट गोष्ट आहे. त्याने ते फूल तोडून नष्ट केले?", आणखी एका यूजरने लिहिले आहे, "ते फूल फारच सुंदर आहे, पण त्याला तोडण्याची गरज नाही".
टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

