होम
दिल्ली | बायडेन यांच्या पर्सनल मॅनेजमेंट कार्यालयाच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या किरण अहुजा यांची नियुक्ती

अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्यांच्या पर्सनल मॅनेजमेन्ट कार्यालयाच्या प्रमुखपदी भारतीय-अमेरिकन वंशाच्या किरण अहुजा यांची नियुक्ती केली आहे. अशा प्रकार अमेरिकन प्रशासनात उच्च स्थान प्राप्त करणाऱ्या किरण अहुजा या पहिल्याच भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. अमेरिकेच्या पर्सनल मॅनेजमेन्ट कार्यालयामध्ये जवळपास 20 लाख कर्मचारी काम करतात.
दिल्ली (Delhi). अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्यांच्या पर्सनल मॅनेजमेन्ट कार्यालयाच्या प्रमुखपदी भारतीय-अमेरिकन वंशाच्या किरण अहुजा यांची नियुक्ती केली आहे. अशा प्रकार अमेरिकन प्रशासनात उच्च स्थान प्राप्त करणाऱ्या किरण अहुजा या पहिल्याच भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. अमेरिकेच्या पर्सनल मॅनेजमेन्ट कार्यालयामध्ये जवळपास 20 लाख कर्मचारी काम करतात. 49 वर्षीय किरण अहुजा यांनी 2015 ते 2017 सालापर्यंत अमेरिकेच्या पर्सनल And मॅनेजमेंट (ओपीएम) कार्यालयात चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केले आहे.
हे सुद्धा वाचा
कोण आहेत किरण अहुजा?
किरण अहुजा यांच्याकडे सार्वजनिक सेवा क्षेत्रात दोन दशकाहून जास्त अनुभव आहे. किरण अहुजा यांनी 2015 ते 2017 सालापर्यंत अमेरिकेच्या पर्सनल अॅण्ड मॅनेजमेंट (ओपीएम) कार्यालयात चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केले आहे. सध्या किरण अहुजा या फिलॉनथेरपी नॉर्थवेस्ट या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या या संस्थेकडून परोपकारी कामे केली जातात.
हे सुद्धा वाचा
त्यांनी अमेरिकन न्यायालयात एक सिव्हिल राइट्स वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. किरण अहुजा यांच्या नियुक्तीचे कॉग्रेसच्या सदस्या असलेल्या जुडी चु यांनी स्वागत केले आहे. किरण अहुजा यांची नियुक्ती म्हणजे जो बायडेय यांनी एक चांगले पाऊल उचलले अशी प्रतिक्रिया जुडी चु यांनी दिली आहे.