Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'दिपकेंची जात आडवी आली का?' तिरंगा रॅलीवरून गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात

'दिपकेंची जात आडवी आली का?' तिरंगा रॅलीवरून गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात

  • तिरंगा रॅलीवरून गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
  • अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या संदर्भात उपस्थित केले प्रश्न
  • शिवाजी पार्क रॅलीतील पोस्टर्स आणि फलक ठरले आकर्षण

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.

या रॅलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेतला. मात्र या कार्यक्रमानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर आणि आंदोलनाच्या राजकीय स्वरूपावर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले.

“विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारचा निर्णय”

माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने निर्णय घेतला असून या विषयावर राजकारण करू नये. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करत काही जुन्या घटनांवरून त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाराष्ट्रातील टीईटी प्रकरणात सरकारने स्वतः कारवाई करून आरोपींना अटक केल्याचेही त्यांनी नमूद केले.

“अभिजित दिपके यांच्या बाबतीत वेगळी भूमिका का ?”

यावेळी सदावर्ते यांनी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांचाही उल्लेख केला. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, जर सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला गेला, तर अभिजित दिपके यांच्या बाबतीत वेगळी भूमिका का दिसली? दीपकेंची जात आडवी आली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे.

'मला आनंद आहे की…', राज-उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सदावर्ते यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका करत काही उपरोधिक टिप्पणी केली. तसेच रॅलीतील घोषणाबाजी आणि राजकीय संदेशांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशा कार्यक्रमांचा वापर राजकीय प्रतिमा उभारण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवाजी पार्कवरील तिरंगा रॅली चर्चेत

दरम्यान, शिवाजी पार्कवरील तिरंगा रॅलीत अनेक आकर्षक आणि चर्चेत राहिलेले पोस्टर्स झळकले. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रासह “कमबॅक करना पडेगा!” असा संदेश असलेला फलक विशेष चर्चेत राहिला. याशिवाय तुकाराम मुंढे आणि अभिजित दिपके यांच्या कार्याचे कौतुक करणारे पोस्टर्स, तसेच विविध सामाजिक आणि राजकीय संदेश असलेले फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या कोळी बांधवांच्या बँड पथकानेही रॅलीत वेगळे आकर्षण निर्माण केले.

तिरंगा रॅलीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या कार्यक्रमाला आणखी राजकीय रंग चढला आहे. त्यांच्या आरोपांवर संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते आणि पुढील काही दिवसांत या विषयावर राजकीय वातावरण कसे बदलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

'फडणवीस केंद्रात गेले तर धर्मेंद्र प्रधानांपेक्षाही जास्त…'; हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra