Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डोक्यावर सेहरा, अंगावर शेरवानी. लग्नाआधी डिलिव्हरी करायला निघाला वर, पेट्रोल पंपावरील दृष्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

डोक्यावर सेहरा, अंगावर शेरवानी. लग्नाआधी डिलिव्हरी करायला निघाला वर, पेट्रोल पंपावरील दृष्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

  • लग्नाच्या वेशात डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.
  • व्हिडिओतील प्रसंग खरा नसून लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी केलेला स्क्रिप्टेड स्टंट.
  • पेट्रोल पंपावरील लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया आणि नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्समुळे व्हिडिओ चर्चेत.
लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी फार खास असतो. बाकी सर्व काम बाजूला ठेवून लग्नाच्या तयारीला यावेळी पहिले प्राधान्य दिले जाते. प्रथेनुसार तर लग्नाची हळद लागल्यावर लग्न लागेपर्यंत वर-वधूचे घराबाहेर जाणही बंद केले जाते. पण अलिकडच्या व्हिडिओमध्ये मात्र भलतेच दृष्य दिसून आले. आपल्या नेहमीच्या दिवसाप्रमाणे डिलिव्हरी बाॅय सामानाची डिलिव्हरी करायला निघाला पण यात ट्विस्ट म्हणजे स्वत:च्या लग्नाच्या दिवशीही तो आपले कर्तव्य विसरले नाही. व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बाॅय डोक्यावर सेहरा आणि अंगावर शेरवानी घालून सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी जाताना दिसला. एक वर आपले लग्न सोडून सामानाची डिलिव्हरी करत आहे हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि लोकांनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करायला सुरुवात केली. चला व्हिडिओत काय दिसलं ते जाणून घेऊया.

शिकार करायला गेला अन् क्षणात बेडकाने डावच पलटला, जंगलाच्या शिकाऱ्याला चावून खाल्लं अन्… शिकारीचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

खरंतर व्हिडिओत दाखवलेले हे दृष्य पूर्णपणे खरे नसून लोकांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी तरुणाने केलेला हा एक स्टंट आहे. वर आपले लग्न सोडून सामानाची डिलिव्हरी करायला गेला तर यावर लोकांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहण्यासाठी तरुणाने हा स्टंट करु पाहिला होता. पांढऱ्या रंगाची शेरवानी, डोक्यावर पगडी आणि गळ्यात कंठी घालून फुल वराच्या वेशात तरुण डिलिव्हरी करायला रस्त्यावर उतरतो. त्याच्या पाठीवर स्वीगीची बॅग असते ज्यावरुन तो जेवणाची डिलिव्हरी करायला निघाल्याचे समजते. वराचा पोशाख आणि पाठीमागे स्वीगीची बॅग घेऊन जेव्हा तरुण पेट्रोल पंपाजवळ जातो तेव्हा ते दृष्य पाहून आजूबाजूची अनेक लोक थक्क होतात. एक वर आपले लग्न सोडून जेवणाची डिलिव्हरी करायला जात आहे या गोष्टीवर अनेकांचा विश्वासच बसत नाही. हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असला तरी लोकांच्या प्रतिक्रियांनी मात्र व्हिडिओची मजा द्विगुणित केली. सोशल मिडियावर व्हिडिओ सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये असून ५ लाखाहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक्स देत यावर आपली पसंती दर्शवली आहे.

नाशिकमध्ये आई-वडिलांनी टाकून दिली चिमुकली; चेहऱ्यावरील निरागस स्मितहास्याने सोशल मीडिया यूजर्स झाले भावूक; Video Viral

हा व्हिडिओ @aakash_dixit_01 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ३ लाखाहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, "फक्त पांढरे शूज घालायचे बाकी होते मग वधू समोरुन निश्चित आली असती", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "जवेण ऑर्डर केलं होतं की वरं?", आणखी एका यूजरने लिहिले आहे, "लग्नात जेवण कमी पडलं वाटतं".

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra