Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत कापड विक्रेत्याला साडेतीन लाखाला फसवले

दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत कापड विक्रेत्याला साडेतीन लाखाला फसवले

बार्शी प्रतिनिधी: दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे आश्वासन देत एका वर्षात कापड विक्रेत्याला तीन लाख 98 हजार 650 रुपयांना फसविल्याचा प्रकार उजेडात आला असून याबाबत संबंधित कापड विक्रेत्याने केलेल्या तक्रारीनुसार बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक तपास फौजदार सोनमाळी करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अल्ताफ अख्तर मोमीन वय 35 वर्षे राहणार बालाजी कॉलनी यांनी फिर्याद दिली असून मोमीन यांनी प्रशांत कमलाकर बडेकर वय 49 वर्षे राहणार आंबेगाव बुद्रुक आंबेगाव पठार पुणे यांची आपल्याबरोबर सोलापूर येथील हॉटेल विकास मध्ये भेट झाल्याचे आहे. या भेटीमध्ये बडेकर यांनी मोमीन यास आपण 26 बँकांचे आर्थिक सल्लागार आहोत असे सांगितले. तसेच तुम्हाला दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो अशी खात्री दिली. त्यानंतर बडेकर यांनी मोमीन याच्याकडून प्रोसेसिंग फी, कर्जाचे इन्शुरन्स व इतर लागणारा खर्च यासाठी दिनांक 4 फेब्रुवारी 2024 पासून दिनांक 9 सप्टेंबर 2025 पर्यंत वेळोवेळी ऑनलाइन व अन्य मार्गाने एकूण तीन लाख आठ हजार सहाशे पन्नास रुपये घेतले. तसेच बार्शी येथे झालेल्या भेटीदरम्यान त्याच्याकडून प्रवासाचा खर्च जेवणाचा खर्च राहण्याचा खर्च असे तीन वेळेस वीस हजार रुपये एवढी रक्कम घेतली. यापैकी 70 हजार रुपये बडेकर यांनी अख्तर करीम मोमीन, सिकंदर लाल मोहम्मद बागवान, श्रीकांत दिनकर बोराडे, यांच्या समक्ष घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे.

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन,घोड्यावर बसून मेलोडी चॉकलेट वाटप

मात्र सुमारे तीन लाख 98 हजार 650 रुपये इतकी रक्कम घेऊनही बडेकर यांनी मोमीन याचे कोणतेही कर्ज प्रकरण मंजूर करून दिले नाही. त्यामुळे अखेर मोमीन यांनी बडेकर यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Solapur News: "ऊस बिलासाठी रणसंग्राम", तोडगा निघेना; पाचव्या दिवशीही शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra