Saturday, 23 Jan, 11.04 am नवराष्ट्र

होम
ड्रामा क्वीन! | कंगना चौकशीसाठी गैरहजर, पोलिसांना दिलं 'हे' कारण!

अभिनेत्री कंगना रणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यापूर्वी सरकारकडून परवानगी घेतली का, असा सवाल न्यायदंडाधिकारी यांनी तक्रारदार अली खाशिफ खान देशमुख यांना शुक्रवारी केला. कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळविण्यासाठी मी अर्ज करणार आहे, असे खान यांनी सांगितले. या अर्जावरील सुनावणी १० मार्च रोजी होईल.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणावतने अख्तर यांच्याबाबत बदनामीकारक टिप्पणी केली होती. यावर आक्षेप घेऊन अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाविरोधात अंधेरी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत जुहू पोलिसांच्या चौकशीला शुक्रवारी गैरहजर राहिली. मुंबईबाहेर असल्याने चौकशीला येऊ शकणार नाही, असे कंगनाने पोलिसांना कळविले.

या प्रकरणात न्यायालयाने कंगनाची चौकशी करून अहवाल १ फेब्रुवारीला सादर करण्याचे आदेश जुहू पोलिसांना दिले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी कंगनाला समन्स बजावले होते. मात्र मुंबईबाहेर असल्याने कंगना चौकशीला उपस्थित राहिली नाही. निवेदनाद्वारे पोलिसांना तिने याची माहिती दिली. दरम्यान आता पुढील तारखेला पोलिसांकडून कंगनाची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री कंगना रणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यापूर्वी सरकारकडून परवानगी घेतली का, असा सवाल न्यायदंडाधिकारी यांनी तक्रारदार अली खाशिफ खान देशमुख यांना शुक्रवारी केला. कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळविण्यासाठी मी अर्ज करणार आहे, असे खान यांनी सांगितले. या अर्जावरील सुनावणी १० मार्च रोजी होईल.

हे सुद्धा वाचा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top