- आता इतक्या लहान वयात वैभववर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
- हर्षा यांनी याच विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
- केवळ १५ व्या वर्षी त्याला ही जबाबदारी का देण्यात आली असा सवाल केला आहे
Duleep Trophy संदर्भात ३० जुलै रोजी, हर्षा भोगले यांनी त्यांच्या 'एक्स' अकाउंटवर लिहिले की, सूर्यवंशीला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यामागील विचार त्यांना समजत नाही. हर्षा यांनी ट्विट केले:
वरिष्ठ रेड-बॉल संघाच्या उपकर्णधारपदी सूर्यवंशीची नियुक्ती करण्यामागील विचार मला समजत नाही. त्याने १२ डावांमध्ये १७.२५ च्या सरासरीने २०७ धावा केल्या आहेत. त्याची प्रतिभा प्रचंड आहे, पण ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे आणि तो अजूनही रेड-बॉल क्रिकेटच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
काही लोक हर्षा भोगले यांच्या मताच्या बाजूने असल्याचे दिसत आहे, त्यांच्या मते वैभवला उपकर्णधारपदी नियुक्त करणे घाईचे आहे. एका वापरकर्त्याने तर सचिन तेंडुलकरचे उदाहरण देत म्हटले, 'प्रत्येकजण गांगुली किंवा विराट नसतो. ९० च्या दशकात, कर्णधारपदाच्या दबावाखाली सचिन जवळजवळ खचून गेला होता. त्या तरुण खेळाडूला अधिक खेळू द्या.'
दुलीप ट्रॉफीने भारतीय देशांतर्गत हंगामाची सुरुवात होते
तुम्हाला माहीत असेलच की, भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत हंगाम दुलीप ट्रॉफीने सुरू होतो. बीसीसीआयने २०२६-२७ हंगामासाठी दुलीप ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केले आहे, जो २३ ऑगस्टपासून सुरू होईल. पहिला सामना पूर्व विभाग आणि उत्तर विभाग यांच्यात खेळला जाईल. १५ सदस्यीय पूर्व विभागाच्या संघाचे कर्णधारपद ईशान किशन भूषवेल आणि मोहम्मद शमी, मुकेश कुमार आणि अभिमन्यू ईश्वरन यांसारख्या अनुभवी खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
कसा आहे संघ
ईशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, कुमार कुशाग्र, विराट सिंह, अनुकूल रॉय, सुदीप घरामी, शिखर मोहन, सुब्रांशु सेनापति, अभिजीत सरकार, डेनिश दास, मोहम्मद शमी, मुकेश कुमार और शाहबाज अहमद आणि सूरज जयसवाल
भाकरी फिरवावी लागणार! Vaibhav Suryavanshi खेळणार 2027 चा वर्ल्डकप? मकरंद वायंगणकरांचा सल्ला चर्चेत

