Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी

दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी

जेवणाच्या ताटात नेहमीच काय भाजी बनवावी? असा प्रश्न सर्वच महिलांना कायम पडतो. नेहमीच त्याच ठराविक भाज्या खाऊन सगळ्यांना खूप जास्त कंटाळा येतो आणि काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चविष्ट कांद्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली कांद्याची भाजी चवीला अतिशय सुंदर लागते आणि चार घास जास्त जातात. गरमागरम कांद्याची भाजी चपाती, भाकरी किंवा वाफाळत्या भातासोबत अतिशय सुंदर लागते. लहान मुलांपासून मोठेसुद्धा भाजीमधील कांदा बाजूला काढून टाकतात. त्यामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे मुलांना या पद्धतीने कांद्याची भाजी बनवून खाण्यास द्यावी. कांद्याचा वापर जेवणातील सर्वच पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया कांद्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य - pinterest)

Recipe : झणझणीत अस्सल गावरान चवीचा कोल्हापूरी तांबडा रस्सा कसा बनवायचा? रेसिपी नोट करा

साहित्य:

  • कांदा
  • तेल
  • लाल तिखट
  • हळद
  • मोहरी जिरं
  • गरम मसाला
  • शेंगदाण्याचा कूट
  • कोथिंबीर
  • हिंग
पारंपरिक चवीचा खमंग तडका! जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी

कृती:

  • कांद्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांद्याची साल काढून पुसून घ्या. त्यानंतर मध्यम आकारात कांदे पातळ चिरून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, जिरं, मोहरी घालून भाजा आणि त्यानंतर त्यात कांदा घालून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा.
  • कांदा मऊ होण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ घालावे. यामुळे कांदा लवकर शिजतो. कांदा शिजल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून भाजा.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट. गरम मसाला घालून मिक्स करा आणि थोडस पाणी घालून शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट घाला. तयार केलेल्या भाजीवर २ मिनिट झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
  • वरून पुन्हा एकदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चविष्ट कांद्याची भाजी. हा पदार्थ घरातील सगळेच आवडीने खातील.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra