Dailyhunt
एकल मातांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून दरमहा २२५० रुपये मदत; तुम्हाला या योजनेबद्दल माहिती आहे का?

एकल मातांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून दरमहा २२५० रुपये मदत; तुम्हाला या योजनेबद्दल माहिती आहे का?

  • सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
  • विधवा, घटस्फोटीत मातांच्या मुलांचा या योजनेत समावेश
  • शिक्षण महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांची भूमिका
मुंबई विभागातील सर्व भागामध्ये क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले योजनेअंतंर्गत एकल माता असणाऱ्या २६७७७ विद्यार्थांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
सदर योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य तसेच शिक्षण महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमधील शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देऊन ही योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

IIT बॉम्बेमध्ये शिकण्यासाठी चक्क इतका खर्च? सोशल मीडियावर 'या' व्हायरल पोस्टमुळे खळबळ!

गरजू बालकांसाठी अर्थसहाय्य

सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची आणि कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गरजू बालकांसाठी अर्थसहाय्य करणे हा आहे. या योजनेनुसार एकल मातेच्या प्रत्येक मुलाला वयाच्या १८ वर्षापर्यंत दर महिना २२५० रू मिळतात.

विधवा, घटस्फोटीत मातांच्या मुलांचा या योजनेत समावेश

गेल्यावर्षी सुरू झालेल्या या योजनेची माहिती अजूनही अनेक विद्यार्थीं आणि एकल मातांना नसल्याने अद्यापही कित्येक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले नसल्याचे दिसून आले. मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील विधवा, घटस्फोटीत व परित्यक्त्या असलेल्या मातांच्या मुलांचा समावेश या योजनेत होतो.

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

राज्यभरातून २ लाख २३ हजार एकल मुले

अलीकडेच शिक्षण विभागाने केलेल्या एकल महिलांच्या मुलांच्या सर्वेक्षणात एकल महिलांसोबतच त्याच्या पाल्याचा प्रश्नसुद्धा गंभीर असल्याचे दिसून आले. तसेच राज्यभरातून २ लाख २३ हजार एकल मुलांची संख्या आढळून आली.

या नुकतीच योजनेची शिक्षकांना माहिती दिल्याने आता विद्यांर्थाच्या अर्ज संख्येत वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. शिक्षक आणि शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी जर ही योजना राबवली तर किमान १८ वर्षापर्यंत या मुलांना मोठी मदत मिळू शकेल असे प्रतिक्रिया अनिल बोरनारे यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra