Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Fake Fertilizer Racket: संभाजीनगरमध्ये बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश; २६ लाखांचा साठा जप्त, नामांकित कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक

Fake Fertilizer Racket: संभाजीनगरमध्ये बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश; २६ लाखांचा साठा जप्त, नामांकित कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश
  • २६ लाखांचा साठा जप्त
  • नामांकित कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बनावट खत रॅकेटचा मोठा पर्दाफाश दौलताबाद पोलिस आणि कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत झाला.
वंजारवाडी येथील गोडाऊनमध्ये नामांकित कंपन्यांच्या छापील रिकाम्या बॅगमध्ये संशयित खत भरून विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत २६ लाख ६२ हजार ७६२ रुपयांचा ११८.७४ मेट्रिक टन खतसाठा, हजारो रिकाम्या बॅगा, पॅकिंग मशिन व साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी अनिल बालाप्रसाद मंत्री (रा. नांदेड वाघाळा), सचिन मारोती निंफळ (रा. वाळूज), बालाजी फॉस्फेट लि. आणि गणेश कृषी उद्योग यांच्याविरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खत निरीक्षक गोविंद पौळ यांच्या फिर्यादीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री कृषी विभाग व पोलिसांनी वंजारवाडीतील गोडाऊनवर धाड टाकली. गोडाऊन बंद असल्याने मागील बाजूस तपासणी केली असता तीन मजूर आढळले. गोडाऊन उघडल्यावर मोठ्या प्रमाणात संशयित खतसाठा व रिकाम्या बॅगा सापडल्या. पथकाला आयएफएफसीओ, पारादीप, इंडियन पोटॅश, कोरोमंडल, आरसीएफ आदी कंपन्यांच्या हजारो रिकाम्या बॅगा आढळल्या. तसेच लेबलविरहित पांढऱ्या बॅगमध्ये संशयित खत, व्हाईट पावडर, मॅग्नेशियम सल्फेट व मोनो अमोनियम फॉस्फेटसदृश साहित्य आढळले. बॅग शिवण्याची मशिन, दोरे व पॅकिंग साहित्यही जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान एक ट्रक (एमएच-२८ बीबी-७८७८) गोडाऊनमध्ये आला. त्यामध्ये ७०० बॅग एसएसपी खत आढळले. कागदपत्रांनुसार हे खत गणेश कृषी उद्योगासाठी असल्याचे नमूद होते; मात्र संबंधितांनी अशी मागणी नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बनावट कागदपत्रांद्वारे खत पुरवठा सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर स्वच्छतेत देशात अव्वल होणार! पालकमंत्र्यांच्या हस्ते आधुनिक कचरा संकलन व्यवस्थेचा शुभारंभ

मजुरांनी चौकशीत सचिन निंफळ यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचे सांगितले. निंफळ यांनी गोडाऊन भाड्याने घेतल्याची कबुली दिली. तसेच नांदेड येथील व्यंकटेश कृषी भांडारचे मालक अनिल मंत्री यांच्या सांगण्यावरून विविध कंपन्यांच्या बॅगमध्ये खत भरून पॅकिंग केले जात असल्याचेही समोर आले. प्राथमिक तपासात परवाना नसताना खत साठवण, पॅकिंग आणि बनावट खत निर्मिती सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात बनावट खत पुरवठ्याचे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वसंत शेळके करत आहेत.

हजारो बॅगा अन् खत, मशिनरी केल्या जप्त

कारवाईत १४ हजार ३५५ रिकाम्या छापील खतबॅगा जप्त करण्यात आल्या. यामध्ये डीएपी, एनपीके, युरिया व एमओपी बॅगचा समावेश आहे. तसेच ३२० बेंग ग्रॅन्युलर खत, ५५३ बेंग पांढरी पावडर, ७०० बैंग एसएसपी खत, युरिया खत, शिवण मशिन व पेंकिंग साहित्यही हस्तगत करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra