होम
#FarmersProtest | ट्रॅक्टर रॅलीत अडीच लाख शेतकरी सहभागी होतील, शेतकरी संघटनांचा दावा, सरकारसमोर आव्हान

आपल्या मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन शेतकऱ्यांनी केलंय. या रॅलीत सहभागी होण्यासाठी पंजाबातील विविध भागांतून शेतकरी दाखल व्हायला सुरुवात झाली असून सुमारे दोन ते अडीच लाख शेतकरी या मोर्चात सहभागी होतील, असा दावा आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तिन्ही राज्यांतून हजारो शेतकरी दिल्लीच्या मार्गावर असून हळूहळू ते राजधानीत दाखल व्हायला सुरुवात होईल, असं सांगितलं जातंय.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज (रविवारी) बरोबर दोन महिने झालेत. आंदोलनाचा आज साठावा दिवस आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय कृषी कायदे मागे घ्यावेत आणि किमान हमीभावाबाबत धोरण निश्चित करावं, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.
कृषि क़ानूनों के खिलाफ टिकरी बाॅर्डर पर किसानों का विरोध प्रदर्शन आज 60वें दिन भी जारी है। एक प्रदर्शनकारी ने बताया, "आज पंजाब, हरियाणा और राजस्थान से काफी ट्रैक्टर आ रहे हैं। हम 26 जनवरी को शांतिपूर्ण ट्रैक्टर परेड निकालेंगे। टिकरी बाॅर्डर पर क़रीब दो-ढाई लाख ट्रैक्टर होंगे।" pic.twitter.com/H6MknOvZZU
- ANI_HindiNews (@AHindinews) January 24, 2021
आपल्या मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन शेतकऱ्यांनी केलंय. या रॅलीत सहभागी होण्यासाठी पंजाबातील विविध भागांतून शेतकरी दाखल व्हायला सुरुवात झाली असून सुमारे दोन ते अडीच लाख शेतकरी या मोर्चात सहभागी होतील, असा दावा आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तिन्ही राज्यांतून हजारो शेतकरी दिल्लीच्या मार्गावर असून हळूहळू ते राजधानीत दाखल व्हायला सुरुवात होईल, असं सांगितलं जातंय.
हे सुद्धा वाचा
केंद्र सरकारनं तिन्ही कृषी कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र हा प्रस्तावदेखील शेतकरी संघटनांनी फेटाळून लावत कायदे रद्द करण्याची मागणी लावून धरली. दिल्ली पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत ट्रॅक्टर मोर्चा न काढण्याचं आवाहन पोलिसांनी केलं होतं. मात्र मोर्चा काढण्याच्या आपल्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत.