Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Fenugreek seeds water: वजन कमी ते ब्लड शुगर कंट्रोल, मेथीच्या पाण्याचे जबरदस्त फायदे; जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Fenugreek seeds water: वजन कमी ते ब्लड शुगर कंट्रोल, मेथीच्या पाण्याचे जबरदस्त फायदे; जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

  • वजन कमी ते ब्लड शुगर कंट्रोल
  • मेथीच्या पाण्याचे जबरदस्त फायदे
  • जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत
भारतीय घरांमध्ये सहज उपलब्ध असलेला मेथी दाणा हा केवळ स्वयंपाकातील मसाला नसून पोषक घटकांचा उत्तम स्रोत मानला जातो.
आयुर्वेदातही मेथीचा वापर विविध आरोग्य समस्यांवर सहाय्यक उपाय म्हणून केला जातो. मेथीचे पाणी नियमित आणि योग्य प्रमाणात घेतल्यास पचनक्रिया सुधारण्यापासून ते रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यापर्यंत अनेक फायदे मिळू शकतात. मात्र, याचे सेवन योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

Malaria: पावसाळ्यात वाढतो मलेरियाचा धोका; लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत

मेथीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. हे शरीरातील ग्लुकोजचे शोषण नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहाचा धोका असलेल्या किंवा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे पाणी फायदेशीर ठरते.

पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत

मेथीचे पाणी नियमित घेतल्यास अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रिया अधिक सुरळीत होते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

मेथीतील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अतिरिक्त खाण्याची सवय कमी होण्यास मदत होते. परिणामी वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाऊ शकते.

त्वचा, केस आणि महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. हे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तसेच हार्मोनल संतुलन राखण्यासही मेथी उपयुक्त ठरू शकते.

मेथीचे पाणी बनवण्याची योग्य पद्धत

एका ग्लास पाण्यात एक ते दोन चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हलके उकळवून घ्या आणि पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. इच्छेनुसार भिजलेले मेथी दाणेही खाऊ शकता.

सेवन करताना घ्या ही काळजी

मेथीचे पाणी मर्यादित प्रमाणातच पिणे योग्य ठरते. गर्भवती महिला, मधुमेहाची औषधे घेणारे किंवा इतर गंभीर आजार असलेल्यांनी नियमित सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत: हून घेताय 'ही' औषधे? जीवावर बेतेल; जाणून घ्या दुष्परिणाम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra