Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
FIFA World Cup 2026: दिवसाची रात्र अन् रात्रीची.; भारतात कुठे आणि कधी दिसणार फिफा वर्ल्ड कप?

FIFA World Cup 2026: दिवसाची रात्र अन् रात्रीची.; भारतात कुठे आणि कधी दिसणार फिफा वर्ल्ड कप?

11 जूनपासून सुरू होणार फिफा वर्ल्ड कप फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत दिसणार नाही भारताचा संघ
यंदा 48 संघ वर्ल्ड कपमध्ये होणार सहभागी

Fifa World Cup 2026: जगभरात आता फुटबॉल चंहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

फुटबॉल जगतातील सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच ‘फिफा वर्ल्ड कप 2026 लवकरच सुरू होणार आहे. जगभराती फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा फिफा वर्ल्ड कप यंदा ऐतिहासिक ठरणार आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

फिफा वर्ल्ड 2026 मध्ये यंदा तब्बल 48 संघ सहभागी होणार आहे. अमेरिका, कानाडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी हे सामने भारतात किती वाजता आणि कुठे पाहता येतील, हे जाणून घेऊयात.

स्पर्धा कधी आणि कुठे होणार?

फिफा वर्ल्ड कप स्पर्धा 11 जून 2026 पासून सुरू होणार आहे. याचा अंतिम सामना 19 जुलै 2026 रोजी खेळवला जाणार आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे देश या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहेत. 16 शहरांमधील विविध स्टेडियमवर हे सामने खेळवले जाणार आहेत. भारतात हे सामने चाहत्यांना रात्री उशिरा जागे राहावे लागणार आहे किंवा पहाटे लवकर उठावे लागणार आहे. तेथील दुपारच्या वेळेतील सामने भारतात रात्री 11 नंतर आणि मध्यरात्री 1 नंतर दिसून शकणार आहेत. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास पाहता होण्याची दाट शक्यता आहे.

FIFA World Cup 2026: खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! इंग्लंड टीमच्या बेस कॅम्पजवळ थरार; अंधाधुंद गोळीबारात ९ जखमी

भारतीय फुटबॉल चाहत्यांना फिफा वर्ल्ड कप 2026 चे सर्व सामने टीव्ही आणि मोबाईलवर घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहेत. भारतात ‘स्पोर्ट्स १८’ या चॅनेलवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच मोबाईल किंवा लॅपटॉपवर विनामूल्य सामने पाहण्यासाठी युजर्स ‘जिओ सिनेमा’चा वापर करू शकणार आहेत.

Netflix वर येतोय FIFA World Cup लाँच एडीशन गेम! कधी आणि कसा खेळता येणार? जाणून घ्या

इंग्लंड टीमच्या बेस कॅम्पजवळ थरार

फिफा विश्वचषक २०२६ सुरू होण्याच्या काही दिवसआधी, अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची एक घटना घडली. अमेरिकेत अशा घटना सर्रास घडत असतात. यावेळी, अमेरिकेतील ही अंदाधुंद गोळीबाराची घटना चर्चेत आहे, कारण ती फिफा विश्वचषक २०२६ साठीच्या इंग्लंड संघाच्या बेस कॅम्पजवळ घडल. इंग्लंड संघाचा बेस कॅम्प मिसौरीमधील कन्सास सिटी येथे आहे, जिथे गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या अंदाधुंद गोळीबारात नऊ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra