Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा 'ही' सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा

Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा 'ही' सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा

  • घराच्या बाल्कनीमध्ये लावा ही फुलझाडे
  • घरातील वातावरण राहते सकारात्मक
  • कोणती फुलझाडे लावावीत

घराच्या सजावटीसाठी अनेक जण घरामध्ये विविध प्रकारची फुलझाड रोप लावत असतात. त्यामुळे घराचे सौदर्यं वाढते.

त्यासोबतच घरातील वातावरण सकारात्मक आणि ताजेतवाने राहते. ही फुलझाडे बाल्कनीमध्ये लावल्यास प्रसन्न वाटते. त्यांच्या सुंगधामुळे मन प्रसन्न राहते. अशी काही फुलझाडे आहेत ती घरात लावणे शुभ मानले जाते. कोणती फुलझाडे घराच्या बाल्कनीत लावावीत जाणून घ्या

घरामध्ये लावा ही फुलझाडे

मोगरा

तुम्ही घरात मोगऱ्याच रोप आणून लावू शकता. यावर कळ्या आल्यावरसुद्धा ते खूप सुंदर दिसते आणि फुले उमलताच त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो. या फुलाला सुगंधी कळ्या आणि पांढऱ्या फुलांसाठी ओळखले जाते. योग्य काळजी घेतल्यास, ते वर्षभर मुबलक फुले देते. या फुलांमध्ये घरामध्ये प्रसन्नता राहते. मात्र हे रोप लावताना त्याची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे.

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

चमेली

चमेलीची फुले खूपच सुगंधी असतात आणि संपूर्ण घर दरवळून टाकतात. तुम्ही मोठ्या कुंडीत याचे – झाड लावू शकता. फुले आल्यावर ते दिसायलाही फारच देखणे वाटते. मात्र या रोपाला रोज पाणी देणे गरजेचे असते. महिन्यातून एकदा हलके सेंद्रिय खत घालणे देखील गरजेचे आहे म्हणजे हे रोप चांगले राहते आणि वाढते.

पारिजाताचे झाड

तुम्ही गॅलरीत पारिजातीचे झाड लावू शकता. यावर पांढऱ्या रंगाची आणि नारंगी देठाची फुले येतात. जी पाहायला अप्रतिम दिसतात आणि याचा सुगंधही खूपच छान असतो. जागा असल्यास हे तुम्ही थेट जमिनीतही लावू शकता. पारिजातकाच्या फुलाला हरसिंगार, शेफाली किंवा प्राजक्ता या नावानी देखील ओळखले जाते.

तुमच्या रोजच्या चालण्याने आरोग्य सुसाट धावेल! अर्धाच्यावर आजार होतील कमी, फक्त 20 मिनिटे…

झेंडूचे झाड

झेंडू ही एक लोकप्रिय फुलांची वनस्पती आहे. झेंडू म्हणजेच मेरीगोल्ड याच्या अनेक जाती असतात. पिवळा, नारंगी (केशरी) मरून (चॉकलेटी) अशा विविध रंगाचे झेंडूची रोप तुम्ही पॉटमध्ये लावू शकता. यामुळे तुमच्या घराची गॅलरी अधिक सुंदर आणि आकर्षक दिसेल. हे रोप सौंदर्यासाठीच नाही तर कीटकांना दूर ठेवण्याच्या क्षमतेसाठी देखील ओळखले जातात.

गुलाब

तुमच्या बाल्कनीत गुलाबाचे रोप लावू शकता. या फुलांच्या वनस्पतीतून सुगंधी फुले येतात जी तुमच्या बाल्कनीला खरोखरच आकर्षक रूप देतात. गुलाबाच्या फुलाचा वास देखील सुंगधित करतो. तसेच ते दिसायला देखील सुंदर आहे. गुलांबाचे फुल हे विविध रंगांमध्ये असते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra