Dailyhunt
France New Education Policy : फ्रान्समध्ये शिक्षण महागणार? भारतीय विद्यार्थ्यांच्या खिशाला किती कात्री लागणार?

France New Education Policy : फ्रान्समध्ये शिक्षण महागणार? भारतीय विद्यार्थ्यांच्या खिशाला किती कात्री लागणार?

  • विद्यापीठाची शुल्क निश्चित करण्याची लवचिकता संपुष्टात येणार
  • फ्रांन्समध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
  • मानवतावादी मूल्यांवर दबाव
France New Education Policy for International Students: भारतातील अनेक विद्यार्थी विदेशात शिक्षणासाठी जाण्याची स्वप्ने पाहतात, जर तुम्हीही फ्रांससारख्या देशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर फ्रेंच सरकारने परदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात केलेल्या नवीन धोरणात्मक बदलांबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
जेव्हा एखादा विद्यार्थी फ्रांन्ससारख्या देशात शिक्षणासाठी येतो तेव्हा त्याला नवीन शैक्षणिक धोरणानुसार जास्त शुल्क भरावे लागणार आहे. तरीही हे शुल्क अमेरिका आणि युकेसारख्या देशांपेक्षा कमीच आहे.

विद्यापीठाची शुल्क निश्चित करण्याची लवचिकता संपुष्टात येणार

‘पीआय न्यूज’च्या (Pi News) अहवालानुसार, बाहेरून येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना बॅचलर प्रोग्रामसाठी वार्षिक शुल्क २,८९५ युरो (अंदाजे ३.२२ लाख रुपये) असेल तर मास्टर प्रोग्रामसाठी हे शुल्क ३,९४१ युरो (अंदाजे ४.३९ लाख रुपये) असेल. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यापीठाची शुल्क निश्चित करण्याची लवचिकता संपुष्टात आली आहे. पूर्वी, काही विद्यापीठे विद्यार्थ्यांकडून कमी शुल्क आकारून जास्त शुल्क माफ करत होते.

Dr. Vikram Sarabhai: पैशापेक्षा देशप्रेम मोठे! केवळ १ रुपया पगारात काम करणाऱ्या महान शास्त्रज्ञाची ही गोष्ट माहितीये का?

फ्रांन्समध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

फ्रेंच सरकारच्या शुल्कवाढीच्या या निर्णयामुळे शिक्षण शुल्कात सूट मिळवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होईल. अशी अपेक्षा आहे की केवळ १०% विद्यार्थी शुल्क सवलतीसाठी पात्र असतील. सरकार उच्च शिक्षणातील ६०% शिष्यवृत्ती केवळ डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम स्टडीज आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये वाटप करण्याची योजना आखत आहे. या बदलाचा थेट परिणाम २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात फ्रांन्समध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांवर होईल.

Indian Students in USA:परदेशात शिक्षणाचं स्वप्न की एकटेपणाची शिक्षा? भारतीय विद्यार्थ्याचा व्हायरल व्हिडिओ काय सांगतो? एकदा बघाच..

मानवतावादी मूल्यांवर दबाव

फ्रेंच विद्यापीठांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली असून यामुळे विद्यपीठांच्या स्वातंत्र्यावर परिणाम होईल, असे म्हटले आहे. देशातील सार्वजनिक विद्यापीठांचे नेतृत्व करणाऱ्या 'फ्रांन्स युनिव्हर्सिटीज' या संस्थेने म्हंटले आहे की, वरवर पाहता शिक्षण शुल्कासंबंधीचा हा निर्णय जगभरातील विद्यापीठे देत असल्याने यामुळे मानवतावादी मूल्यांवर दबाव निर्माण होणार आहे. ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवणे कठीण होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra