- स्पेन-फ्रान्समधील जंगलातील आगींचा कहर
- उष्णतेमुळे युरोपमध्ये दुष्काळाचे संकट
- मृतांच्या आकड्यात वाढ
स्पेनमध्ये भीषण परिस्थिती
स्पेनच्या ईशान्येला कॅटोलोनियात सर्वाधिक भीषण परिस्थिती आहे. येथील जंगलातील आगीमुळे २,३०० हेक्टरहून अधिक वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत आहे. ही आग संरक्षित नैसर्गिक अभयारण्याच्या दिशेने सरकत आहे. यामुळे आग नियंत्रणात आणण्यात मोठे आव्हान अग्निशमन दलासमोर आहे.
फ्रान्समध्येही दक्षिणेकडी अनेक जंगलाच्या परिसरातील आग भडकली आहे. हजारो अग्निशमन कर्मचाकी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. काही भागांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
मृतांच्या आकड्यात वाढ
युरोपमध्ये जून महिन्याच्या अखेरीस आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. यामुळे मृतांची संख्या वाढत सून फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये मिळून सुमारे ३,७०० लोकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्पेनमध्येही १,००० हून अधिक लोकांचा उष्णतेशी संबंधित आजाराने मृत्यू झाला आहे. सध्या अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
हवामान बदलामुळे गंभीर परिणाम
हवामान तज्ज्ञांच्या मते, वातावरणातील बदलामुळे युरोपमध्ये उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि वारंवार येत आहेत. यामुळे जगंलातील आगी, दुष्काळ, पाणी टंचाई आणि आरोग्यविषय समस्या वाढत आहेत. येते काही दिवस स्पेन आणि फ्रान्समध्ये तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. सरकारने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवहन केले आहे.
Pak-Baloch Conflict : बलुचिस्तानमध्ये BLA चा मोठा हल्ला; पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघाती स्फोट; ३० सैनिक ठार

