- निवडक boAt प्रोडक्ट्सच्या खरेदीवर ग्राहकांना 3 महिन्यांचे स्पॉटिफाय प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
- स्पॉटिफाय प्रीमियममध्ये जाहिरातींशिवाय संगीत, ऑफलाइन डाउनलोड आणि हाय-क्वालिटी ऑडिओ स्ट्रीमिंगचा लाभ मिळेल.
- boAt ने अलीकडेच निर्वाणा युटोपिया 2 एएनसी हेडफोन्स भारतात 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहेत.
एक नवीन डिजिटल कँपेन
या पार्टनरशिपसोबत कंपन्यांनी ही ऑफर प्रमोट करण्यासाठी एक नवीन डिजिटल कँपेन देखील सुरु केले आहे. कंपनीने सांगितंल आहे की, या भागिदारीअंतर्गत एलिजिबल प्रोडक्ट्ससाठी एक बंडल स्पॉटिफाय प्रीमियम ऑफर आणि एक नवीन डिजिटल कँपेन समाविष्ट आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, निवडक boAt प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्या यूजर्सना 3 महिन्यांसाठी स्पॉटिफाय प्रीमियम सब्स्क्रिप्शन ऑफर केले जाणार आहे. यामध्ये यूजर्सना जाहिरातींशिवाय प्लेबॅक, ऑफलाइन डाउनलोड्स आणि हाय-क्वालिटी ऑडियो स्ट्रीमिंगसारख्या सुविधा ऑफर केल्या जाणार आहेत. (फोटो सौजन्य - AI Created)
स्पॉटिफाय प्रीमियम ऑफर निवडक boAt प्रोडक्ट्सच्या खरेदीवर उपलब्ध
या घोषणेसह boAt आणि स्पॉटिफाय प्रीमियमने हाफ द एक्सपिरिअंस नावाने एक डिजिटल कँपेन घोषित केले आहे. या जाहिरतीमध्ये म्यूजिशियन चार दीवारी यांना जाणूनबुजून अर्ध्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना दाखवले आहे. बंडल ऑफरवर स्विच केल्यावर हे कॉन्सर्ट पुन्हा सामान्य होते. खंडित प्लेबॅक आणि बंडलमधील ऐकण्याचा अनुभव यांमधील फरक अधोरेखित करण्यासाठी हा क्रम तयार करण्यात आला आहे. ही स्पॉटिफाय प्रीमियम ऑफर निवडक boAt प्रोडक्ट्सच्या खरेदीवर उपलब्ध आहे. कंपनी पात्र डिव्हाईसची यादी किंवा या प्रमोशनची शेवटची तारीख अद्याप जाहिर केली नाही.
निर्वाणा युटोपिया 2 एएनसी हेडफोन्स
विशेष म्हणजेच, boAt ने अलीकडेच भारतात निर्वाणा युटोपिया 2 एएनसी हेडफोन्स 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. हे हेडफोन्स कॉस्मिक ब्लॅक आणि युटोपियन व्हाईट रंगांच्या पर्यायांत उपलब्ध असून यामध्ये डुअल ड्राइवर्स, 45dB पर्यंत एडेप्टिव हाइब्रिड एएनसी, हाई-रेज ऑडियो, 3D स्पॅटियल ऑडियो, ब्लूटूथ 5.4, AI-बेस्ड कॉलिंग फीचर्स आणि 80 तासांपर्यंत बॅटरी लाईफ ऑफर केली जाणार आहे. हे डिव्हाईस गूगल फास्ट पेयर, फास्ट चार्जिंग आणि boAt हिअरेबल ॲपला देखील सपोर्ट करते.

