Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. मिठाई, साखर किंवा चाॅकलेट इत्यादी पदार्थ विकत आणून खाल्लेले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ सगळ्यांच खाऊसा वाटतो.

अशावेळी तुम्ही मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम बनवून खाऊ शकता. उपावासाच्या दिवशी अतिशय आवडीने रताळी खाल्ली जातात. रताळ्यामध्ये विटामिन सी, विटामिन सी, फायबर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे आहारात रताळ्यांचा समावेश करावा. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात रताळ्यांचा समावेश करावा. रताळ्यामध्ये आढळणारे विटामिन ए डोळ्यांचे रक्षण करते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते.त्यामुळे कोणताही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास रताळ्याचे गुलाबजाम नक्की बनवून पाहावे. हे गुलाबजाम आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतात आणि लवकर खराब होत नाहीत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य - istock)

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार 'ब्रेड पकोडा'

साहित्य:

  • रताळी
  • साखर
  • केशर
  • वेलची पावडर
  • राजगिरा पीठ
  • तूप
  • पाणी
१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

कृती:

  • गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात साखर आणि केशर काड्या घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा.
  • उकडलेली रताळी पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून हाताने मॅश करून घ्या. मॅश केलेल्या रताळ्यामध्ये राजगिरा पीठ आणि वेलची पावडर घालून पीठ मळून घ्या.
  • चपातीच्या पिठासारखा मऊ गोळा मळून झाल्यानंतर काहीवेळ झाकण मारून पीठ बाजूला ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तयार केलेल्या पीठाचे छोटे गुलाबजाम बनवून कढईमधील गरम तेलात तळण्यासाठी सोडा.
  • गॅस मंद आचेवर ठेवून गुलाबजाम भाजा. यामुळे गुलाबजाम व्यवस्थित भाजले जातील आणि गुलाबजाम काळे होणार नाहीत.
  • भाजलेले गुलाबजाम तयार केलेल्या साखरेच्या पाकात घालून मुरण्यासाठी ठेवा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रताळ्याचे मऊ लुसलुशीत गुलाबजाम. हा पदार्थ घरातील सगळ्यांच खूप जास्त आवडेल.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra