Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Girija Oak : मुंबईचा 'तो' काळा दिवस! काळाला सामोरे जाणाऱ्या लढवय्यांची कथा "Bharat Bhagya Vidhata"

Girija Oak : मुंबईचा 'तो' काळा दिवस! काळाला सामोरे जाणाऱ्या लढवय्यांची कथा "Bharat Bhagya Vidhata"

  • अनेकांना आयुष्यभरासाठी Traumatized व्हावे लागले
  • 26 नोव्हेंबर 2008, या दिवसाला प्रत्येक मुंबईकर कधीही विसरू शकत नाही
  • 26/11 मध्ये लढा देण्याऱ्या त्या प्रत्येक नायकासाठी एक श्रद्धांजली आहे
Bharat Bhagya Vidhata : 26 नोव्हेंबर 2008, मुंबईच्या इतिहासातील सगळ्यात काळा दिवस! या दिवशी शेकडो-हजारो मुंबईकरांचे जीव टांगणीला लागले होते. अनेकांनी प्राणही सोडले तर अनेकांना आयुष्यभरासाठी Traumatized व्हावे लागले. या दिवसाला प्रत्येक मुंबईकर कधीही विसरू शकत नाही. ते क्षण आठवले तर दुःख तर होतच पण त्याचबरोबर मनामध्ये रागाची ज्वालाही पेटून उठते आणि आठवतो तो रणसंग्राम, ज्यात मुंबईच्या वीर पोलिसांनी ज्या पद्धतीने अतिरेक्यांना लढा दिला. आठवतो तो रणसंग्राम, जेव्हा हॉटेल, हॉस्पिटलचे स्टाफही बिना वर्दीचे पोलीस झाले आणि आपल्या लोकांसाठी या काळाला सामोरे गेले.

प्रलय आएगा! 'Tumbbad 2' मध्ये Alia Bhatt ची दमदार एन्ट्री; केवळ कॅमिओ नव्हे, तर कथेला देणार मोठा ट्विस्ट!

हा सगळा रणसंग्राम आता मोठ्या पडद्यावरती अनुभवता येणार आहे. जाणून घेता येणार आहे त्या प्रत्येक शौर्याला, ज्या शौर्यामुळे मुंबईतील अनेक घरं आज आबाद आहेत. त्या शौर्याला मोठ्या पडद्यावर उतरवण्याचे कार्य अभिनेत्री आणि politician कंगना रणौतने हाती घेतले आहे. 12 जून 2026 रोजी, संपूर्ण भारतात 'भारत भाग्य विधाता' हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'Bharat Bhagya Vidhata' हा सिनेमा Manoj Tapadia दिग्दर्शित आणि लिखित चित्रपट असून तो 26/11 मध्ये लढा देण्याऱ्या त्या प्रत्येक नायकासाठी एक श्रद्धांजली आहे. या चित्रपटाची कथा 2008 Mumbai attacks दरम्यान घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. विशेषतः Cama and Albless Hospital येथे घडलेल्या प्रसंगांवर हा सिनेमा केंद्रित आहे.

गिरीजा ओक झळकणार मुख्य भूमिकेत!

नुकतीच भारताची नॅशनल क्रश झालेली अभिनेत्री गिरीजा ओक 'Bharat Bhagya Vidhata' या सिनेमात मुख्य पात्र साकारणार आहे. स्वतः Girija Oak ने तिच्या सोशल मीडिया हँडलवर सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. सिनेमात आणखीन काही मराठी कलाकार जसे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम आणि नुकतीच विवाह ऋणानुबंधनात अडकलेली अभिनेत्री इशा डे तसेच Indian Fashion Icon Milind Soman ही झळकणार आहे.

Deool band 2 : 'देऊळबंद 2' चा Teaser पाहण्यासाठी व्हा सज्ज! 'आता परीक्षा देवाची' 11 वर्षांनंतर सिक्वेलमधला दुसरा सिनेमा

गिरजाने पोस्ट शेअर करत मोठे कॅप्शन दिले आहे. तिने नमूद केले आहे की, 'सामान्य माणसांची असामान्य कहाणी! त्या रात्रीची गोष्ट… जेव्हा मानवता भीतीपेक्षा मोठी ठरली. जेव्हा बलिदान हीच जबाबदारी बनली आणि एकोपा हाच खरा कर्तव्य! सामर्थ्याने अनेकांचे जीव वाचले आणि वाचवले गेले. 'Bharat Bhagya Vidhata' देशातल्या खऱ्या पण कुणाला माहित नसलेल्या नायकांची कथा!' हा सिनेमा 12 जून रोजी देशभरात प्रसिद्ध करण्यात येईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra