मखाणा शरीरासाठी सुपरफूड मानला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आहारात मखाणाचे सेवन करतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तरुण वयात हाडांच्या वाढलेल्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
मखाणामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात अनेकांना काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही मखाणा खीर बनवू शकता. सुका मेवा आणि मखाणा शरीराला खूप जास्त पोषण देतात. नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही मखाणापासून वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चला तर जणूं घेऊया क्रिमी मखाणा खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य - pinterest)
साहित्य:
- मखाणा
- दूध
- साखर
- सुका मेवा
- चारोळी
- तूप
- वेलची पावडर
- केशर
कृती:
- क्रिमी मखाणा खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करा आणि त्यात मखाणा घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
- त्यानंतर पुन्हा एकदा तुपात काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यामुळे चव सुंदर लागते.
- मखाणा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर पावडर बनवा. मखाणा जास्त बारीक करू नये.
- मोठ्या टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला एक उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून दूध उकळवून घ्या.
- दूध घट्ट झाल्यानंतर त्यात आवडीनुसार साखर किंवा गुळाची पावडर मिक्स करा. मिश्रण घट्टसर झाल्यानंतर त्यात मखाणा पावडर घालून मिक्स करा.
- त्यानंतर त्यात सुका मेवा आणि केशर काड्या घालून खीरला उकळी काढा.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली क्रिमी मखाणा खीर. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

