Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोल्डन गर्ल्सचा दमदार पंच! CWG 2026 मध्ये प्रिया घंघास आणि साक्षी चौधरीने जिंकले सुवर्णपदक

गोल्डन गर्ल्सचा दमदार पंच! CWG 2026 मध्ये प्रिया घंघास आणि साक्षी चौधरीने जिंकले सुवर्णपदक

  • बॉक्सिंगमध्ये भारताचा दबदबा
  • प्रिया घंघास आणि साक्षी चौधरीने जिंकले सुवर्णपदक
  • बॉक्सिंगमध्ये एकूण सात सुवर्णपदके
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ चा (Commonwealth Games 2026) दहावा दिवस भारतीय बॉक्सर्ससाठी ऐतिहासिक ठरला.
या दिवशी भारतीय बॉक्सर्सनी बॉक्सिंग रिंगमध्ये सुवर्णपदकांचा वर्षाव केला आहे. भारताने बॉक्सिंगमध्ये एकूण सात सुवर्णपदके जिंकली.भारताची स्टार बॉक्सर साक्षीने महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रुबी व्हाईटला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर, प्रियाने महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या मेरी बथुल अल अहमदीला ४-१ ने पराभूत करून आणखी एक सुवर्णपदक जिंकले.

IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?

साक्षी चौधरीने ५१ किलो वजनी गटात जिंकले सुवर्णपदक

शनिवारी एसईसी हॉल ५ येथे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय बॉक्सर साक्षी चौधरीने इंग्लंडच्या रुबी व्हाईटचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. साक्षीने सामन्याच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये आपले पूर्ण वर्चस्व राखले आणि आपल्या प्रतिस्पर्धीला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. पहिली फेरी पूर्णपणे साक्षीच्या बाजूने गेली, ज्यात पाचही पंचांनी तिच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर रुबीने दुसऱ्या फेरीत उल्लेखनीय पुनरागमन केले, ज्यात चार पंचांनी तिला १०-१० गुण दिले. अंतिम फेरीत, साक्षीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवत पाचही पंचांकडून १०-१० गुण मिळवले.साक्षीच्या या शानदार विजयामुळे भारताला बॉक्सिंग स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक मिळाले.

पहिली फेरीनंतर प्रियाचे जबरदस्त कमबॅक

महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय बॉक्सर प्रिया घंघास आणि कॅनडाच्या मेरी-बथुल अल-अहमदियेह आमनेसामने आल्या. प्रिया घंघासने कॅनडाच्या मारी-बाथुल अल-अहमदियेहचा ४-१ ने पराभव केला. ‘ब्लू कॉर्नर’मधील या कॅनेडियन बॉक्सरने पहिला राऊंड ३-२ ने जिंकला, ज्यात तीन पंचांनी तिच्या बाजूने १०-१० असे गुण दिले होते. तथापि, प्रियाने पुढच्या राऊंडमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि चारही पंचांकडून १०-१० गुण मिळवले. अंतिम राऊंडमध्ये प्रियाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि चारही पंचांकडून १०-१० गुण मिळवून विजेतेपदाची लढत जिंकली. प्रियाच्या या कामगिरीमुळे, भारताने आता या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग स्पर्धांमध्ये आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरले.

17 वर्षीय Tanvi Sharma ची कमाल! Taipei Open 2026 जिंकून संपवला 18 वर्षांचा दुष्काळ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra