Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Google Pay झाले आणखी स्मार्ट! आता 'Ask Google Pay' AI फीचर ठेवणार तुमच्या खर्चाचा हिशोब, यूजर्सना असा होणार फायदा

Google Pay झाले आणखी स्मार्ट! आता 'Ask Google Pay' AI फीचर ठेवणार तुमच्या खर्चाचा हिशोब, यूजर्सना असा होणार फायदा

  • गुगल पे मध्ये Gemini AI वर आधारित ‘Ask Google Pay’ फीचर लॉन्च करण्यात आले असून ते यूजर्सच्या खर्चाचे स्मार्ट विश्लेषण करणार आहे.
  • हे AI चॅटबॉट खर्चाचा पाय चार्ट, व्यवहारांचे वर्गीकरण आणि आर्थिक सवयी सुधारण्यासाठी वैयक्तिक सूचना देणार आहे.
  • गुगलने एसबीआय कार्ड सोबत भागीदारी करून भारतात गुगल पे फ्लेक्स एसबीआय कार्ड देखील लॉन्च केला आहे.
भारतात ऑनलाईन पेमेंटची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बरेच लोकं ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी गूगल पेचा वापर करतात. भारतात लाँच करण्यात आल्यापासून आतापर्यंत गूगल पे ला अनेक अपडेट्स मिळाले आहेत. यामुळे हे डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या यूजर्सचा अनुभव दिवसेंदिवस आणखी चांगला होत आहे. आता देखील गूगल पे साठी एक नवीन फीचर लाँच करण्यात आले आहे.

स्मार्टफोनच्या दुनियेत नवा अध्याय! 0mm डिस्प्ले बॉर्डरसह Tecno चा कॉन्सेप्ट फोन; IFA 2026 मध्ये होणार मोठा धमाका

जेमिनी-पावर्ड AI चॅटबोट

अलीकडेच कंपनीने गूगल पे साठी आस्क गूगल पे नावाने एक जेमिनी-पावर्ड AI चॅटबोट लाँच केला आहे. यामुळे यूजर्सना एक नवीन संवादात्मक अनुभव मिळणार आहे. हे आस्क गूगल पे AI चॅटबोट यूजरच्या खर्चाच्या सवयीवर आधारित प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सक्षम आहे. यामुळे यूजर्स त्यांच्या खर्चाचे विश्लेषण करू शकतात. याशिवाय गूगलने भारतात RuPay नेटवर्कवर आधारित गुगल पे ने फ्लेक्स एसबीआय कार्ड लाँच करण्यासाठी एसबीआय कार्डसोबत पार्टनरशिप करण्याची घोषणा केली आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

आस्क गूगल पे लाँचिंगची घोषणा

गेल्या आठवड्यात शेअर करण्यात आलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने आस्क गूगल पे लाँचिंगची घोषणा केली आहे. हे गूगलच्या जेमिनी एआय मॉडेल्सद्वारे समर्थित एक डेडिकेटेड AI चॅटबॉट आहे. हे एक ऑप्ट-इन फीचर आहे, याचा अर्थ असा आहे की, हे चॅटबोट वापरण्यासाठी यूजर्सना चॅटबोटला स्वत:हून सक्षम करावे लागणार आहे. आस्क गूगल पे च्या मदतीने यूजर्स त्यांच्या खर्चाचे विश्लेषण करण्यास सांगू शकतात. यामुळे यूजर्सना त्यांच्या खर्चाची सवय आणखी चांगल्या पद्धतीने ट्रॅक करण्यासाठी मदत होणार आहे. हे फीचर ॲक्सेस करण्यासाठी यूजर्सना गूगल पे मध्ये पपर्सनलायझेशन चालू करावे लागणार आहे.

उदाहरणार्थ, एखादा यूजर आस्क गूगल पे चॅटबोटकडून त्याच्या गेल्या महिन्याच्या खर्चाच हिशोब मागू शकतो. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एआय चॅटबोट डेटा काढून पाय चार्टच्या स्वरूपात दाखवेल, व्यवहारांची श्रेणीनुसार यादी करेल आणि खर्चाच्या सवयी सुधारण्यासाठी टिप्स देईल. याप्रमाणे, आस्क गूगल पे यूजरच्या सवयींनुसार, टेलर्ड ऑफर्स आणि क्रेडिट कार्ड ऑप्शन्स देखील शोधू शकणार आहेत. हे कम्पाउंडिंग इंटरेस्ट जसे फाइनेंशियल टर्म्स अगदी सोप्या भाषेत समजावून सांगू शकणार आहे आणि यावरून कर प्रणालींमधील फरकही स्पष्ट होऊ शकतो.

Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत… ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

गूगलने पुढे सांगितलं आहे की, आस्क गूगल पे यूजर्सना एसआयपी आणि क्रेडिट स्कोर सारख्या फाइनेंशियल कॉन्सेप्ट्स समजवण्यासाठी देखील मदत करणार आहे. प्रश्नांची उत्तर देताना हे चॅटबोट यूजरच्या ट्रांजेक्शन हिस्ट्री आणि क्रेडिट रिपोर्ट डेटाचा रेफरेंस घेऊ शकतो, ज्यामुळे पर्सनल रिकमेंडेशन्स आणि सल्ला देऊ शकतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे एआय चॅटबोट 10 भारतीय भाषांमध्ये यूजर्सचे प्रश्न समजून उत्तरं देऊ शकतो. याचा वापर करण्यासाठी टेक्स्ट आणि वॉयस कमांड्स दोन्हीचा सपोर्ट मिळणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra