- गोव्याच्या प्रवासादरम्यान तरुणाचं गुपित उघडलं.
- गोव्याच्या फ्लाईटमध्ये घडला प्रकार.
- घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये विमानात गोंधळ सुरु असल्याचे दिसते. तरुण आणि तीनही प्रेयसींमध्ये मोठा वाद पेटलेला असतो. हा वाद शारीरिक हिंसेपर्यंत पोहचत नाही पण यात शाब्दिक बाचाबाची नक्कीच रंगते. इतर प्रवासी या घटनेची सीटवर बसूनच मजा घेत असतात. एक एअर हाॅस्टेस त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी आणि विमानातील गोंधळ शांत करण्यासाठी मध्यस्ती बनते पण त्याचा या वादावर फारसा फरक पडत नाही. आपली फसवणूक झाली आहे यावरुन तीनही गर्लफ्रेंड्स रागाने इतक्या पेटलेल्या असतात की त्या तरुणाला डाफरायची एकही संधी चुकवत नाहीत. आता हा सर्व हाय व्होल्टेज ड्रामा खरा आहे की स्क्रिप्टेड याची मात्र अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हा व्हिडिओ @gambhirsin24472 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, 'गोव्याला निघण्यापूर्वी विमानातच गुपित उघड झालं! एक नाही, तर तीन गर्लफ्रेंड्स… विमानतळावर गोंधळ उडाला. काहींना तर एकही गर्लफ्रेंड नाही, आणि तो तर अनेकींना डेट करत आहे'. या अजब-गजब घटनेवर आता यूजर्सने मिश्किल प्रतिक्रिया करत घटनेची चांगलीच मजा लुटल्याचे दिसले. यात एका यूजरने म्हटले की, "ही एअरलाइनची चूक आहे, त्यांनी सगळ्यांची तिकिटे एकाच वेळी का बुक केली?", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "हा स्क्रिप्टेड व्हिडिओ दिसतोय" आणखीन एका युजरने लिहिले आहे, "म्हणून एकापेक्षा जास्तीचा मोह ठेवू नये".
टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

