Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
GT Vs RCB Live: आरसीबीने जिंकला टॉस; गुजरातच्या अडचणी वाढवण्यासाठी घेतला 'हा' निर्णय

GT Vs RCB Live: आरसीबीने जिंकला टॉस; गुजरातच्या अडचणी वाढवण्यासाठी घेतला 'हा' निर्णय

विराट कोहली विरुद्ध कागिसो रबाडा रंगणार सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच
रजत पाटीदार विरुद्ध शुभमन गिल आमनेसामने

Tata IPL 2026 GT Vs RCB Live Updates: थोड्याच वेळात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा सामना सुरू होणार आहे.

रजत पाटीदार अन् शुभमन गिल आमनेसामने येणार आहेत. एम. चिन्नास्वामी (GT Vs RCB) स्टेडियमवर हा सामना होणार आहे. विराट कोहली विरुद्ध कगीसो रबाडा असा सामना पाहायला मिळेल. दरम्यान आजच्या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजचा सामना आरसीबी आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. गुजरात सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 8 व्या तर आरसीबी 3 ऱ्या स्थानावर आहे. गुजरातने हा सामना जिंकल्या ते टॉप 4 मध्ये फोकहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुभमन गिल आणि त्याचा संघ आज सामना जिंकण्यासाठी आक्रमक खेळी आणि भेदक गोलंदाजी करण्याचा अंदाज आहे.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

बंगळुरूचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम हे फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. 2026 च्या हंगामातही येथे मोठे स्कोअर पाहायला मिळाले आहेत.ही खेळपट्टी अत्यंत सपाट आणि कडक आहे, ज्यामुळे चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटके खेळू शकतात. सुरुवातीच्या 2-3 ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. परंतु त्यानंतर फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरकीपटूंना धावा रोखणे कठीण जाऊ शकते.

Mumbai Indians चे वाभाडे निघताच हार्दिकवर आकाश अंबानी नाराज? 'त्या' कृतीचा Video Viral

आतापर्यंत या मैदानावर 104 आयपीएलचे सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 56 सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.आजचा सामना हाय-स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि शुभमन गिल यांसारख्या दिग्गज फलंदाजांसाठी ही खेळपट्टी रन मशीनसारखी असणार आहे.

IPL 2026 मध्य रोमांच निश्चित; किंग कोहली Vs प्रिन्स गिल! चिन्नास्वामीवर 'विराट' संघर्ष, पहा Playing 11

आजची संभाव्य प्लेइंग 11

आरसीबी: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, रासिद सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड. (इम्पॅक्ट प्लेयर: देवदत्त पडिक्कल)

गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, ग्लेन फिलिप्स, कागिसो रबाडा, अशोक शर्मा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra