Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
GT vs RR :  फायनलच्या तिकिटासाठी 'गुजरात-राजस्थानमध्ये' रंगणार महामुकाबला; कधी अन् कुठे होणार सामना? जाणून घ्या

GT vs RR : फायनलच्या तिकिटासाठी 'गुजरात-राजस्थानमध्ये' रंगणार महामुकाबला; कधी अन् कुठे होणार सामना? जाणून घ्या

  • राजस्थानने हैदराबादला चारली धूळ
  • गुजरात अन् राजस्थान भिडणार
  • कधी अन् कुठे होणार सामना?
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या प्लेऑफमध्ये राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ४७ धावांनी धुव्वा उडवला.
या विजयासह त्यांनी आयपीएल ट्रॉफीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. बुधवारी (दि. २७) झालेल्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थानने सर्व विभागांत उत्कृष्ट कामगिरी केली आणि क्वालिफायर २ मध्ये आपली जागा पक्की केली. आता अंतिम फेरीतील दुसरा संघ निश्चित करण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर २ सामना रंगणार आहे.

Vaibhav Sooryavanshi: ३ धावांनी शतक हुकल्यानंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला, 'मला रेकॉर्ड्स नकोत, पण… १५ वर्षीय खेळाडूचे मोठे वक्तव्य

राजस्थानने हैदराबादला चारली धूळ

एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २४३ धावांचा डोंगर उभा केला. या डावाचा मुख्य शिल्पकार ठरला १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी. त्याने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची वादळी खेळी करत १२ षटकार आणि ५ चौकारांची आतषबाजी केली. एका हंगामात सर्वाधिक ६५ षटकार मारण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर ५९ षटकारांसह १४ वर्षांपासून कायम होता. ध्रुव जुरेलनेही २१ चेंडूंमध्ये ५० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.२४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्येच संघाने चार विकेट्स गमावल्या आणि अखेर संपूर्ण संघ १९६ धावांवर सर्वबाद झाला. राजस्थानच्या गोलंदाजांनीही अचूक गोलंदाजी करत हैदराबादला महत्वपूर्ण सामन्यात धूळ चारली.

कधी अन् कुठे होणार क्वालिफायर- २ सामना?

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर २ सामना शुक्रवार, २९ मे रोजी महाराजा यादवेंद्र सिंग पीसीए स्टेडियम, मुल्लानपूर, न्यू चंदीगड येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा हायव्होस्टेज सामना सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक ७ वाजता होणार आहे. या सामन्याचा विजेता संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी IPL 2026 च्या ट्रॉफीसाठी भिडणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार असून जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

दोन्ही संघाचे स्क्वॉड

गुजरात टायटन्स संघ – शुभमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), जेसन होल्डर, इशांत शर्मा, जयंत यादव, कागिसो रबाडा, राहुल तेवतिया, ल्यूक वूड, शाहरुख खान , साई किशोर, वॉशिंग्टन सुंदर, राशीद खान, मोहम्मद सिराज, ग्लेन फिलिप्स, प्रसिद्ध कृष्णा, कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत, कुमार कुशाग्र, मानव सुथार, कोनोर एस्टरहुइझेन, गुरनूर ब्रार, निशांत सिंधू, अरशद खान, अशोक शर्मा.

राजस्थान रॉयल्स संघ– रियान पराग, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, ॲडम मिल्ने, संदीप शर्मा, डोनोव्हन फरेरा, ध्रुव जुरेल, युद्धवीर सिंग, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, शिमरॉन हेटमायर, तुषार देशपांडे, नांद्रे बर्गर, कुलदीप, शुभमदुबे, रवी बिश्नोई, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, अमन राव, अमनजोत सिंग चहल, यश पुंजा, रवी सिंग, ब्रिजेश शर्मा, क्वेना मफाका, लुआन-ड्रे प्रिटोरियस.

'मला कोणी सांगितलंच नाही…' वैभव सूर्यवंशीने केला धक्कादायक खुलासा, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला आणि माहीतच नाही

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra