Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हा तुझा की माझा? एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन् मग जे झालं. Video Viral

हा तुझा की माझा? एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन् मग जे झालं. Video Viral

  • एका बॉयफ्रेंडसाठी 5 मुली भांडल्या
  • रस्त्यात सुरु केली फाईट
  • दृश्य पाहून आजूबाजूची मुलंही घाबरली
सोशल मीडियावर अनेक वेळा भांडणांचे व्हिडिओ व्हायरलहोतात, विशेषतः महिलांच्या भांडणांचे. परंतु, एका बॉयफ्रेंडसाठी मुलींना भांडताना कधी पाहिलं आहे का?
अलीकडेच एक अनोखे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यात भररस्त्यात तब्बल 5 मुली एका बॉयफ्रेंडसाठी भांडताना दिसून आल्या. मुलींना असं भांडताना पाहून आजूबाजूचेही थबकले आणि अनेकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

अजब लग्नाची गजब कहाणी! घोड्यावर बसले अन् वधूच्या घरी पोहचले तब्बल 29 वर, मग पुढे जे घडलं… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, दोन मुली आपापसात वादात गुंतलेल्या असताना, एक दुसऱ्याच्या केसांना धरून ओढतात. सुरूवातीला हे एक साधं भांडण वाटत असलं तरी, दुसऱ्या क्षणात, आणखी एक मुलगी अचानक त्या दोघांच्या भांडणात सामील होते. हेच इथे थांबत नाही; व्हिडिओत दाखवलेल्या घटनेत, दोन मुली एकमेकांवर जमिनीवर पडून लढताना आणि एकमेकांचे केस ओढताना दिसतात. सर्व जणी एकमेकींवर तुटून पडलेल्या असतात. या भांडणाची सुरुवात एक बॉयफ्रेंडमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन मुलींची भांडणं सुरु असताना तिथे तिसरी आणि मग आणखीन दोन मुली या भांडणात सामील होतात. अशा प्रकारे एकाच वेळी पाच मुली एकमेकांवर हल्ला करत असतात, कोणी केस ओढत तर कोणी चापट मारतात. हा सर्वच प्रकार रस्त्यावर घडल्यामुळे अनेकजण ते पाहून हादरल्याचे दिसून आले. काहींनी तर हे दृश्य आपल्या फोनमध्ये कैद केले.

देशी-विदेशीचा अनोखा मिलाफ! गंगा घाटावर घुमले परदेशी सूर पण स्थानिकाच्या नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, "एक लक्षात घेण्यासारखी आहे की स्त्रिया मारामारीत कधीच मुक्का मारत नाहीत." तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "बाकीची मुलं तिथून निघून जात होती, यावरून भांडणाचे गांभीर्य दिसून येते' आणखीन एका युजरने लिहिलं आहे, 'यांना बिग बॉसमध्ये पाठवायला हवं'.

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra