Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Hair Botox:  हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Hair Botox: हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

  • हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ
  • केस होतात सॉफ्ट अन् सिल्की
  • ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
धूळ, प्रदूषण, आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा अतिवापर यामुळे केस निस्तेज होतात. कोरडे, फ्रिझी आणि स्प्लिट एंड्स मुळे लोक विविध हेअर ट्रीटमेंट्सकडे वळत आहेत.
त्यामध्ये सध्या 'हेअर बोटॉक्स' ही ट्रीटमेंट विशेष लोकप्रिय ठरत आहे. केसांना नैसर्गिक चमक, मऊपणा आणि मजबुती देणारी ही प्रक्रिया अनेक ब्युटी सलूनमध्ये मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र ही ट्रीटमेंट करण्यापूर्वी तिचे फायदे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

Skin Care Tips: टॅन अन् डल स्कीनला करा बाय, घरीच तयार करा 'हा' फेस पॅक; त्वचा होईल चमकदार

नेमकं काय आहे हेअर बोटॉक्स?

हेअर बोटॉक्स ही केसांना डीप कंडिशनिंग देणारी उपचार पद्धत आहे. या प्रक्रियेत केसांवर प्रोटीन, व्हिटॅमिन्स, केराटिन आणि नैसर्गिक पोषक घटकांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे यामध्ये त्वचेवरील बोटॉक्सप्रमाणे इंजेक्शन दिले जात नाही. खराब आणि तुटलेले केस दुरुस्त करून त्यांना स्मूथ आणि शायनी बनवणे हा या उपचाराचा मुख्य उद्देश असतो.

हेअर बोटॉक्सचे फायदे कोणते?

ही ट्रीटमेंट केल्यानंतर केस अधिक मऊ, सिल्की आणि चमकदार दिसतात. फ्रिझीनेस कमी होऊन केस व्यवस्थित सेट होण्यास मदत होते. तसेच स्प्लिट एंड्स आणि कोरडेपणाची समस्या कमी होते. अनेक तज्ज्ञांच्या मते, नियमित स्ट्रेटनिंग किंवा हीट स्टायलिंगमुळे खराब झालेल्या केसांसाठी हेअर बोटॉक्स फायदेशीर ठरू शकते.

उपचाराआधी या गोष्टी लक्षात ठेवा

हेअर बोटॉक्स करण्यापूर्वी केसांचा प्रकार आणि स्कॅल्पची स्थिती तपासणे महत्त्वाचे असते. तसेच, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक सलूनमध्ये वापरली जाणारी प्रोडक्टस सारखी नसतात. काही प्रोडक्ट्समध्ये अशी केमिकल असू शकतात जी सेसिंटिव्ह स्कॅल्पला किंवा कमकुवत केसांना हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे, या उपचाराबाबत नेहमी प्रोफेशनल आणि प्रतिष्ठित सलूनचा सल्ला घ्या. जर तुम्हाला जास्त केसगळती, स्कॅल्प ऍलर्जी किंवा केसांशी संबंधित इतर कोणतीही समस्या जाणवत असेल, तर आधी तज्ञांचा सल्ला घ्या. तसेच उपचारानंतर सल्फेट-फ्री शॅम्पू वापरण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून ट्रीटमेंटचा परिणाम अधिक काळ टिकू शकेल.

नैसर्गिक काळजीही तितकीच महत्त्वाची

तज्ज्ञांच्या मते, कोणतीही हेअर ट्रीटमेंट कायमस्वरूपी उपाय नसते. योग्य आहार, भरपूर पाणी, नियमित तेल मालिश आणि कमी केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केल्यास केस नैसर्गिकरित्या निरोगी राहू शकतात.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Skin Pigmentation: चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनमुळे त्रस्त आहात? 'हे' घरगुती उपाय करा ट्राय, त्वचा उजळेल

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra