- हनुमान चालिसाचे व्रत केल्याने होणारे फायदे
- हनुमान चालिसाचे व्रत का करावे
- हनुमान चालिसाचे महत्त्व
हनुमान चालीसा हे स्त्रोत हनुमान यांना समर्पित असल्याचे मानले जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार, श्रद्धेने आणि नियमाने हनुमान चालीसा पठण केल्याने मनाला शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
आयुष्यात सतत अडथळे येतायत? काहीच मार्ग नाही असं वाटतंय तर आता हनुमान चालिसाचे व्रत करून पाहा. हनुमान चालिसाचे व्रत नेमकं काय आहे ते जाणून घेऊया
भक्तांची श्रद्धा
भगवान हनुमान हे शक्ती, भक्ती आणि संकटमोचनाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या कृपेसाठी अनेक भक्त हनुमान चालीसाचे नियमित पठण करतात. विशेषतः हनुमान चालिसाचे व्रत केल्याने जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतात, अशी श्रद्धा आहे.
Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
हनुमान चालिसाचे व्रत करण्याचे फायदे
हनुमान चालिसाचे व्रत म्हणजे साधारण 1, 11, 21 किंवा 40 दिवस रोज चालिसाचे पठण करणे होय. यामध्ये संयम, नियम आणि भक्ती महत्त्वाची असते. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून हनुमान यांची मूर्ती समोर ठेवावी. हनुमानाला दिवा लावून त्याला फूल अर्पण करून चालिसा म्हणावी. काहीजण दररोज 1, 7 किंवा 11 वेळा चालिसाचं पठण करतात. तुम्ही देखील तुम्हाला जस जमेल तस हे व्रत करू शकता. काहीजण हे व्रत सलग 11, 21 किंवा 40 दिवस करतात. तर काही जण आठवड्यातून मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस व्रताचे ठेवतात. व्रताच्या या काळात काही नियमाचं पालनही केलं जातं. जसं की, सात्विक आहार घ्यावा, खोटं बोलणं, राग येण किंवा वाईट सवय टाळाव्यात. मन शांत आणि एकाग्र ठेवणं यामुळे मनशांती आणि आत्मविश्वास वाढते. नकारात्मकता आणि भीती कमी होते, अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. साक्षात हनुमंताची कृपा आपल्याला मिळते, असे मानलं जातं. हे व्रत कठोर नियमांपेक्षा श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून असतं. मनापासून केलेलंही थोडसं पठण प्रभावित मानलं जातं.
हनुमान चालिसा व्रताचे महत्त्व
हनुमान चालीसा हे गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेले एक प्रभावी स्तोत्र आहे. यामध्ये भगवान हनुमानाच्या गुणांचे वर्णन केले आहे. नियमित पठण केल्याने मन शुद्ध होते आणि भक्तीची भावना वाढते.
हे व्रत कधी करावे
दररोज किंवा मंगळवार/शनिवारी हनुमान चालीसा पठण करावे
स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने पूजा करावी
हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे
शक्य असल्यास उपवास ठेवावा
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

