Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हवेतच जीवाचा थरार! विमानाची जोरदार धडक, आकाशातच पॅरोशूट फाटलं अन् महिलेचा जीव मृत्यूच्या सापळ्यात अडकला; Video Viral

हवेतच जीवाचा थरार! विमानाची जोरदार धडक, आकाशातच पॅरोशूट फाटलं अन् महिलेचा जीव मृत्यूच्या सापळ्यात अडकला; Video Viral

  • आकाशात सुरू असलेला साहसी खेळ काही सेकंदांत भीषण अपघातात बदलला.
  • हवेतच नियंत्रण सुटल्याने महिलेची स्वतःला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली.
  • प्रसंगावधान राखत केलेल्या एका निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली.
अनेक मजेदार व्हिडिओज व्हायरल होत असतानाच आता मात्र सोशल मिडियावर एक चित्तथरारक घटनेचा व्हिडिओशेअर करण्यात आला आहे. घटना ऑस्ट्रियामध्ये घडल्याची माहिती असून यात एका महिलेसोबत गंभीर अपघात घडून आल्याचे दिसून आले. अपघात काही सांगून येत नाही आणि तो कधी कसा घडून येईल ते सांगता येत नाही. अशीच काहीशी घटना महिलेसोबत आकाशात पॅराग्लायडिंग करताना घडली.

यमराजांचा जावई जणू…! व्यक्तीने कचऱ्यापासून तयार केली सर्वात भयानक बाईक, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

घडलं असं की, महिला खुल्या आकाशात पॅराशूटच्या मदतीने पॅराग्लायडिंगचा आनंद लुटत होती पण याचदरम्यान एक विमान महिलेच्या पॅराशूटला येऊन धडकले. विमानाला तर काही झाले नाही पण या धडकेमुळे महिलेचे पॅराशूट फाटले ज्यामुळे हवेतच तिचा तोल ढासळू लागला. यानंतर महिला घाबरली आणि आकाशातच आपल्या बचावासाठी तिची धडपड सुरु झाली. ही संपूर्ण घटना आता कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

नक्की काय घडलं?

ही थरारक घटना ऑस्ट्रियातील श्मिटेनहोहे पर्वताजवळ घडून आल्याची माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार, ४४ वर्षांची पॅरोग्लायडर सबरीना शनिवारी दुपारच्या सुमारास आकाशात पॅराग्लायडिंगचा आनंद लुटत होती. सर्वकाही सामान्यपणे सुरु होते पण काही क्षणातच परिस्थितीने भीषण रुप घेतले. अवघ्या काही सेकंदातच तिथून एक वेगवान विमान सबरीनाच्या पॅराशूटला धडकून पुढे गेला ज्यानंतर तिचे पॅराशूट फाटले आणि तोल ढासळल्याने ती जमिनीच्या दिशेने खाली पडू लागली.

व्हिडिओमध्ये सबरीना खाली पडत असताना स्वतःला वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करताना दिसते. खाली पडत असतानाही ती शांतपणे परिस्थिती हाताळते आणि वेळीच इमरजंसी पॅराशूट खोलते ज्यामुळे तिचा जीव वाचतो. घटना भीषण होती पण सबरीनीच्या प्रसंगावधानाने तिचा जीव वाचवला. या घटनेमुळे सबरीनाला काही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर सबरीनाने इंस्टाग्रामवर सांगितले की, "मी जिवंत आहे आणि इथे बसून हे सगळं लिहित आहे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये".

Petrol Diesel Memes : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जनतेचा संताप अनावर; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

रिपोर्टनुसार, सबरीना आकाशातून खाली पडल्यानंतर काहीवेळातच तिला पोलिस हेलिकाॅप्टरच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आलं होतं आणि यानंतर तिच्यावर उपचारही करण्यात आले. दुसरीकडे सबरीनाच्या पॅराशूटला धडकल्यानंतर विमान देखील सुरक्षितपणे लँडींग करण्यास यशस्वी झाले. विमानाचे थोडे नुकसान झाले पण कोणतीही जिवितहानी यात घडली नाही. पायलटच्या म्हणण्यानुसार, पॅराग्लायडर अचानक त्याच्या समोर आली ज्यामुळे त्याला टक्कर टाळता आली नाही. या घटनेचा व्हिडिओ @aviationbrk नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra