Dailyhunt
Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? 'ही' योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? 'ही' योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

  • गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं?
  • ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते
निरोगी आरोग्यासाठी पाणी पिणं महत्वाचं आहे असं डॉक्टरांकडून वारंवार सांगितलं जातं. पाण्यामुळे अनेक आजार कमी होतात त्यामुळे दिवसभरातून तीन ते चार लीटर पाणी शरीरात जाणं महत्वाचं आहे.
खरंतर दिवसभरात जसं पाणी पिणं महत्वाचं आहे तेवढंच सकाळी उठल्यावर पाणी पिणं महत्वाचं आहे. काही सवयी या खूप छोट्या छोट्या असतात पण त्याच तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. सात ते आठ तासाच्या झोपेत शरीराला पुरेसं पाणी मिळत नाही त्यामुळे या वेळेत शरीर काही अंशी डीहायड्रे़ड होतं. म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या पहिले पाणी पिणं महत्वाचं आहे.

आता प्रश्न पडतो की रोज सकाळी उठल्यावर पाणी थंड प्यावं की गरम ?यावर तज्ज्ञ सांगतात की, सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी प्यायल्याने पचनक्रियेला चालना मिळते. शरीर डीटॉक्स होण्यास देखील यामुळे मदत होते. रात्रभर शरीरात साचलेले विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) बाहेर टाकण्यास पाण्याची मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि आतड्यांची हालचाल सुरळीत होते. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कोमट पाणी फायदेशीर ठरतं. कोमट पाण्यात लिंबू किंवा मध घातल्यास त्याचा फायदा अधिक वाढू शकतो.

फुफ्फुसातील श्लेष्म वाढला की संरक्षण कमी होते! IIT मुंबईच्या संशोधनातून उलगडला 'म्युकस पॅराडॉक्स'

थंड पाण्याचे परिणाम

सकाळी थंड पाणी पिण्याने शरीराला तात्पुरती ताजेतवानेपणा मिळतो. मात्र अतिशय थंड पाणी पिल्यास पचनक्रिया मंदावू शकते. काही लोकांना घसा दुखणे किंवा सर्दीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे रिकाम्या पोटी थंड पाणी पिणं टाळलं पाहिजे.

तज्ज्ञ काय सांगतात?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सकाळी कोमट किंवा साधारण तापमान असलेलं पाणी पिणे अधिक योग्य आहे. यामुळे शरीर हळूहळू सक्रिय होते आणि पचनसंस्था सुरळीतपणे काम करू लागते.

किती पाणी प्यावे?

सकाळी उठल्यानंतर किमान एक ते दोन ग्लास पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. मात्र एकदम जास्त पाणी पिण्याऐवजी हळूहळू घोट घोट पाणी प्यावे.सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे ही सवय आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. योग्य प्रमाणात आणि योग्य तापमानाचे पाणी पिल्यास पचन सुधारते, शरीर डिटॉक्स होते आणि दिवसाची सुरुवात ऊर्जेने होते.

पोटात अल्सर झाल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष न करता वेळीच करा उपचार

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra