Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Heart Health: निरोगी हृदयासाठी दररोज करा 'हे' व्यायाम ; या गोष्टींचीही घ्या काळजी

Heart Health: निरोगी हृदयासाठी दररोज करा 'हे' व्यायाम ; या गोष्टींचीही घ्या काळजी

  • हृदयासाठी नियमित व्यायाम फायदेशीर
  • निरोगी हृदयासाठी करा ‘हे’ व्यायाम
  • या गोष्टींची घ्या काळजी
आजकाल बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, फास्टफूडचे वाढते सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराच्या समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत.
पूर्वी केवळ वृद्धांमध्ये आढळणारे हृदयविकार आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, प्रत्येक व्यायाम हृदयाच्या रुग्णांसाठी सुरक्षित असेलच असे नाही. चुकीच्या पद्धतीने किंवा अतिप्रमाणात केलेला व्यायाम हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करू शकतो. त्यामुळे हृदयाच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत, कोणते टाळावेत आणि व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Weight Loss Tips: डाएटिंग करूनही वजन कमी होत नाहीये? जाणून घ्या यामागचे महत्वाचे कारण

हृदयासाठी नियमित व्यायाम फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते, हृदयाच्या रुग्णांसाठी हलका आणि नियंत्रित व्यायाम सर्वात सुरक्षित ठरतो. दररोज २० ते २० मिनिटे चालणे हा उत्तम पर्याय मानला जातो. नियमित चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयावरचा ताण कमी होण्यास मदत होते. याशिवाय हलके सायकलिंग, पोहणे, स्ट्रेचिंग आणि योगा हे व्यायामही फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः योगा आणि प्राणायामामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शरीर रिलॅक्स राहते.

योगा

योगा हा तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी एक सर्वोत्तम व्यायाम आहे. नियमित योगा केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आणि विश्रांतीच्या वेळी हृदयाचे ठोके स्थिर राहतात.

ब्रिस्क वॉक

ब्रिस्क वॉक हा हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो . यामुळे सांध्यांवर जास्त ताण येत नाही. जलद चालण्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि हृदयाचे ठोके वाढतात. हे करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. सुरुवातीला, प्रत्येक वेळी १०-१५ मिनिटे सामान्य गतीने चाला. हळूहळू हा वेळ ३० मिनिटांपर्यंत वाढवा.

सायकलिंग

सायकलिंगमुळे सांध्यांवरील ताण कमी होतो आणि हृदयालाही फायदा होतो. तुम्ही फिटनेस वॉचच्या मदतीने तुमच्या हृदयाचे ठोके सहजपणे तपासू शकता. ज्यांना संधिवात आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे.

पोहणे

पोहणे हा एक सुरक्षित एरोबिक व्यायाम आहे जो हृदयाच्या रुग्णांसाठी उत्तम मानला जातो. पोहण्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज कमी होते.

कोणती काळजी घ्यावी

हृदयाच्या रुग्णांनी व्यायामाची सुरुवात नेहमी हळूहळू करावी. अचानक जास्त वेळ किंवा वेगाने व्यायाम केल्यास शरीरावर ताण येऊ शकतो. व्यायाम करताना छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे किंवा खूप थकवा जाणवल्यास लगेच थांबणे आवश्यक आहे. तसेच व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअप आणि नंतर कूलडाउन करणेही महत्त्वाचे मानले जाते. तसेच, जड वजन उचलणे, अतिशय कठीण वर्कआउट किंवा जास्त दाब येणारे व्यायाम हृदयाच्या रुग्णांनी टाळावेत. अशा व्यायामांमुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Weekend Trip: वीकेंड ट्रिपचा प्लॅन करताय? मुंबई-पुणेपासून हाकेच्या अंतरावर आहेत 'ही' सुंदर ठिकाणं, ठरतील बेस्ट पिकनिक स्पॉट्स

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra