Dailyhunt
हेल्दी आणि टेस्टी, यंदा कैरीचं नाही तर घरी बनवा आवळ्याचं चटकदार लोणचं, रेसिपी आहे फार सोपी

हेल्दी आणि टेस्टी, यंदा कैरीचं नाही तर घरी बनवा आवळ्याचं चटकदार लोणचं, रेसिपी आहे फार सोपी

  • आवळा हा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि लोहाचा उत्तम स्त्रोत आहे.
  • तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आवळ्यापासून टेस्टी लोणचं बनवू शकता.
  • चला आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी जाणून घेऊया.
भारतीय स्वयंपाकात लोणच्याला विशेष स्थान आहे आणि त्यातही आवळ्याचं लोणचं हे चव आणि आरोग्याचा सुंदर संगम मानलं जातं.
आवळा हा व्हिटॅमिन C ने भरलेला असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. थोडासा आंबट, किंचित कडसर आणि मसाल्यांच्या मिश्रणामुळे तयार होणारं हे लोणचं जेवणाची चव अनेक पटींनी वाढवतं.

मासे प्रेमींसाठी खास! तंदुरशिवाय घरी बनवा स्मोकी आणि मसालेदार 'तंदूर प्रॉन्स', चव जी नेहमीच लक्षात राहिल…

पारंपरिक पद्धतीने बनवलं जाणारं आवळ्याचं लोणचं दीर्घकाळ टिकतं आणि प्रत्येक घासाला एक वेगळीच चव देते. घरच्या घरी बनवलेलं लोणचं केवळ चविष्टच नाही तर सुरक्षित आणि आरोग्यदायीही असतं. कमी साहित्य आणि सोप्या प्रक्रियेमुळे हे लोणचं सहज तयार करता येतं, त्यामुळे रोजच्या जेवणात एक खास टच मिळतो. चला नोट करून घेऊयात रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • ५०० ग्रॅम आवळे
  • ३ टेबलस्पून मोहरी
  • २ टेबलस्पून मेथी दाणे
  • २ टीस्पून हळद
  • २ टेबलस्पून लाल तिखट
  • ३ टेबलस्पून मीठ (चवीनुसार)
  • १/२ कप तेल (साधारण मोहरीचं किंवा रिफाइंड)
  • १ टीस्पून हिंग
Summer Drink: उन्हाळ्यात शरीरात वाढलेला थकवा क्षणात होईल दूर! १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत कोकम मॉकटेल

कृती

  • सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुऊन कुकरमध्ये १ शिट्टी येईपर्यंत वाफवून घ्या.
  • नंतर थंड झाल्यावर त्यांच्या फोडी वेगळ्या करा आणि बिया काढून टाका.
  • कढईत मेथी दाणे आणि मोहरी हलक्या आचेवर भाजून घ्या. थंड झाल्यावर जाडसर वाटून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात आवळ्याच्या फोडी, हळद, लाल तिखट, मीठ आणि तयार केलेला मसाला घालून चांगले मिक्स करा.
  • कढईत तेल गरम करून त्यात हिंग घाला आणि हे गरम तेल आवळ्याच्या मिश्रणावर ओता. सगळं नीट एकत्र करून थंड होऊ द्या.
  • तयार लोणचं स्वच्छ आणि कोरड्या बरणीत भरून ठेवा.
  • २-३ दिवसांनी मसाले छान मुरल्यावर लोणचं खाण्यास तयार होतं.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra