Dailyhunt
Hengli Petrochemical: ट्रम्प यांचा चीनवर 'इकोनॉमिक बॉम्ब'; इराणला मदत करणारी चीनची मोठी रिफायनरी अमेरिकेने केली ब्लॅक लिस्ट

Hengli Petrochemical: ट्रम्प यांचा चीनवर 'इकोनॉमिक बॉम्ब'; इराणला मदत करणारी चीनची मोठी रिफायनरी अमेरिकेने केली ब्लॅक लिस्ट

  • चीनला मोठा तडाखा
  • इराणची आर्थिक नाकेबंदी
  • अब्जावधी डॉलर्सचा व्यवहार उघड

US sanctions on China refinery Hengli 2026 : जागतिक राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. एकीकडे इराणसोबत युद्धाचे ढग गडद होत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी इराणची आर्थिक रसद तोडण्यासाठी थेट चीनवर निशाणा साधला आहे.

इराणकडून बेकायदेशीरपणे तेल खरेदी करणाऱ्या चीनमधील एका महाकाय तेल शुद्धीकरण कारखान्यावर (Oil Refinery) अमेरिकेने कडक निर्बंध लादले आहेत. या कारवाईमुळे केवळ इराणचीच नव्हे, तर चीनचीही मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चीनची 'हेंगली' रिफायनरी रडारवर

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील 'हेंगली पेट्रोकेमिकल (डालियान) रिफायनरी कंपनी लिमिटेड' ही इराणकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी इराणच्या तथाकथित 'शॅडो फ्लीट' (Shadow Fleet) म्हणजे छुप्या जहाजांच्या ताफ्याचा वापर करून अब्जावधी डॉलर्सचे तेल चीनमध्ये आणत होती. अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट केले की, ही कारवाई इराणच्या राजवटीवरील आर्थिक पकड घट्ट करण्यासाठी आणि त्यांच्या लष्करी हालचालींना मिळणारा निधी रोखण्यासाठी करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Talks: इराणचा ट्रम्पना 'ठेंगा'! इस्लामाबादमध्ये अमेरिकेशी चर्चेला स्पष्ट नकार; अजूनही आखाती देशांवर युद्धाची टांगती तलवार

इराणी सैन्याला मिळणारा 'लाखो डॉलर्सचा' महसूल रोखला

तपासानुसार, हेंगली रिफायनरीने 'सेपेहर एनर्जी जहान नामा पार्स' कंपनीमार्फत इराणच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफशी संबंधित जहाजांकडून तेल स्वीकारले होते. या व्यवहारामुळे इराणच्या लष्कराला थेट लाखो डॉलर्सचा महसूल मिळत होता, ज्याचा वापर मध्यपूर्वेतील दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. या कारवाईत केवळ चिनी कंपनीच नाही, तर इराणचे तेल वाहून नेणाऱ्या आणखी १९ जहाजांवरही बंदी घालण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२५ पर्यंत अमेरिकेने अशा प्रकारे १,००० हून अधिक संस्था आणि विमानांवर निर्बंध लादले आहेत.

credit - social media and Twitter

काय आहेत या निर्बंधांचे परिणाम?

अमेरिकन कायद्यानुसार, ज्या कंपन्यांवर किंवा जहाजांवर हे निर्बंध लादले जातात, त्यांची अमेरिकेतील सर्व मालमत्ता गोठवली जाते. याशिवाय, कोणताही अमेरिकन नागरिक किंवा बँक त्यांच्याशी व्यवहार करू शकत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या कंपन्यांना मदत करणाऱ्या इतर परदेशी बँकांवरही अमेरिका कारवाई करू शकते. यामुळे जागतिक बाजारपेठेत हेंगली रिफायनरीचा व्यापार करणे आता अशक्य होणार आहे. ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, इराणचे तेल जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यास मदत करणाऱ्या कोणत्याही मध्यस्थाला सोडले जाणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kuwait Attack : कुवेत सीमेवर महासंग्राम! इराकी ड्रोनचा उत्तरेकडील चौक्यांवर भीषण हल्ला; फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानाने जगाला हादरवले

जागतिक तेल बाजारपेठेत खळबळ

चीनमधील 'टीपॉट्स' (Teapots) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतंत्र रिफायनरीज इराणच्या कच्च्या तेलाच्या सर्वात मोठ्या खरेदीदार आहेत. मात्र, हेंगली सारख्या मोठ्या कंपनीवर कारवाई झाल्यामुळे चीनच्या तेल उद्योगात भीतीचे वातावरण आहे. यामुळे इराणचा तेल महसूल घटणार असून, त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम राबवणे कठीण होणार आहे. दुसरीकडे, या कारवाईमुळे अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra