Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इच्छा तिथे मार्ग! आई फुलं विकतेय अन् चिमुकली रस्त्यावरच अभ्यासात मग्न; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

इच्छा तिथे मार्ग! आई फुलं विकतेय अन् चिमुकली रस्त्यावरच अभ्यासात मग्न; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

  • आई फुलं विकतेय अन् चिमुकली रस्त्यावरच अभ्यासात मग्न
  • VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. या डिजिटल काळात सगळ्यांकडे स्मार्टफोन असल्याने लोक कुठेही काही अतरंगी, अजब आणि चुकीचे घडताना दिसले की सोशल मीडियावर शेअर करतात.
सध्या एका नेटकऱ्याने अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. यातून इच्छा तिथे मार्ग, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते याचा प्रत्यय आला आहे. हा व्हिडिओ चेन्नईतील असून एक मुलगी रस्त्यावर अभ्यास करताना दिसत आहे. तिथे बाजूलाच तिची आई फुले विकत आहे.

Stunt Video : आता तर हद्दच झाली! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी थेट अंगावर चढवली बाईक; थरारक स्टंटचा VIDEO VIRAL

अलीकडे अनेक मुलांना अभ्यासासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. एसी रुम, स्मार्टफोन, लॅपटॉप, ढीगभर पुस्तकं, आरामादायी खुर्ची, अभ्यासाठी स्वत:ची खोली असेत. पण तरिही सतत त्यांच्याकडे काही नसल्याची किरकिर करत राहतात. तर दुसरीकडे अनेक मुलांकडे दोन वेळेच्या खायचेही वांदे असतात. अशी परिस्थितीत ही मुले अडचणींवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर चांगला अभ्यास करुन भरभरुन यश मिळवतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच आहे. आर्थिक तंगी आणि संसाधनांच कमतरता असतानाही या चिमुकलीने आपली शिक्षणाची जिद्द सोडलेली नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,एक मुलगी रस्त्याच्या कडेला बसून मन लावून अभ्यास करत आहे. आजूबाजूला वाहनांची ये-जा सुरु आहे. गाड्यांच्या हॉर्नचा गोंधळ आहे. पण तिचे संपूर्ण लक्ष तिच्या पुस्तकात आहे. तिथेच बाजूला तिची आई स्टूलवर बसून फुलं विकताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (@Mercedes5494 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काही क्षणांतच हजारो लोकांपर्यंत पोहोचला असून अनेकांच्या पसंतीस पडत आहे. नेटकऱ्यांकडून या मुलीचे भरभरुन कौतुक केले जात आहे.

हे फक्त पुण्यातच होऊ शकतं! वरून धो-धो पाऊस, खाली झाडांना टँकरने पाणी; नेटकरी म्हणाले, 'पुणे मनपाचा नादच खुळा'

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra