Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IND vs ENG 2nd T20: दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ? सामना पुन्हा रद्द होणार? पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

IND vs ENG 2nd T20: दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ? सामना पुन्हा रद्द होणार? पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

  • दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ?
  • भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट
  • दुसऱ्या टी२० सामन्यात हवामान कसे असेल ?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जाईल.
भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सामना सुरू होईल तर, ६:३० वाजता नाणेफेक होईल. या मालिकेतील पहिला सामना चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमवर खेळला गेला होता. पावसामुळे भारताच्या डावानंतर हा सामना रद्द करण्यात आला होता. आजच्या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. आजच्या या महत्वाच्या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा आणि हवामानाचा अंदाज, जाणून घेऊयात.

Cristiano Ronaldo Retirement: 'हा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्ड कप?' बहिणीच्या दाव्याने खळबळ; निवृत्तीवर CR7चे मोठे वक्तव्य

भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये प्रभावी ठरले आहेत, पण त्यानंतर धावांचा पाऊस पाहायला मिळतो. मँचेस्टरमध्ये आतापर्यंत एकूण १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ चार सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सहा सामने जिंकले असून पाच सामने रद्द झाले आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे १५० धावा आहे. इंग्लंडने या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले असून, सात सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल.

दुसऱ्या टी२० सामन्यात हवामान कसे असेल ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. यावेळी पाऊस पडण्याची २० टक्के शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत असेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज असून, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचा हा तिसरा सामना

भारतीय संघाने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, २०११ मध्ये त्यांना सहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. या स्टेडियमवर भारताने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०१८ मध्ये खेळला होता, ज्यात त्यांनी आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हवामानही महत्त्वाची भूमिका बजावेल, कारण पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून, त्यात घातक गोलंदाज जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झाले आहे. नाणेफेकीनंतर भारताचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला जाईल आणि आज संघात वैभव सूर्यवंशीचा समावेश होण्याची शक्यता आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनची जागा तो घेऊ शकतो, असे वृत्त आहे.

Cristiano Ronaldo: रोनाल्डोचा नॉकआउट गोल! विश्वचषकात रचला इतिहास; क्रोएशियावर 2-1 ने मात करत पोर्तुगालची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra